Download App

अजित पवारांचे शिंदेंच्या पावलावर पाऊल, पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगात जाण्याचे संकेत

Maharashtra politics: राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे जाऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना जागा दाखवणार, असा इशारा असा होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आपल्या देशात आणि राज्यात कोणत्याही पक्षाचे पेचप्रसंग निर्माण झाले तर त्यासंदर्भात निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोग सांगतो पक्ष आणि चिन्ह कोणाकडे आहे. त्या संदर्भात आपल्याला लवकर कळेल. आम्ही म्हणजेच पक्ष हा विचार करुन आम्ही पुढं चाललो आहेत. आमदार आमच्यासोबत आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निडवणूक आयोगात जाण्याचे संकेत दिले.

कोणाला बंड वाटते पण मनात आले म्हणून काही वाटणे चालत नाही. कायदा, घटना, नियम आहे, कोणाला तरी तिथं अधिकार दिलेला आहे. निवडणूक आयोगाला स्वायत्ता आहे. या संदर्भातील उद्या काही वाद निर्माण झाला तर त्यांनी दिलेला निर्णय अंतिम असतो. अलिकडच्या काळात वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

रुपाली चाकणकर थेट अजितदादांच्या व्यासपीठावर; तटकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन गटातील संघर्षाला सुरुवात झाली आहे. बंडानंतर आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारच्या राष्ट्रवादीची नवीन टीम जाहीर केली आहे. यामध्ये सुनिल तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.तर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. त्यांच्या हाकालपट्टी केल्यानंतर सुप्रिया सुळे यांची हाकालपट्टी करणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की आम्ही हाकालपट्टी करण्यासाठी पक्ष काढलेला नाही. आम्ही बेरजेचे राजकारण करतो, पक्ष वाढीचे काम करतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

Tags

follow us