Anand Paranjape Criticize Supriya Sule Rahul Gandhi : खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पुन्हा मतदानात गडबड असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. यावर अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉग्रेस मुख्य प्रवक्ता आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) उद्याची दिल्लीची मतगणना होत आहे. त्यामुळं काँग्रेसचा पराभव दिसत असल्यामुळे शिळ्या कढीला ऊत आल्यासारखं मराठीतील म्हण म्हणावं लागेल, अशी टीका त्यांनी केलीय.
लोकसभेच्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्रात 31 खासदार निवडून आले. त्यांनंतर कधीही मतदान यादी सदोष आहे, अशा पद्धतीची पत्रकार परिषद कधी घेतली नाही. तर 2019 च्या विधानसभेनंतर 2024 च्या लोकसभेपर्यंत 32 लाख केवळ मतदार यादीमध्ये वाढले. लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत 39 लाख मतदार वाढले अशा प्रकारचा आरोप केलाय.
Santosh Deshmukh murder : ‘कृष्णा आंधळेला ठार मारले असेल…’; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप
लोकसभेनंतर मतदार नोंदणीत प्रत्येक राजकीय पक्ष आणि ज्याला विधानसभा लढायची आहे, असा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागतो. नवीन मतदार याची नोंदणी करतो, यात काँग्रेसही कुठे मागे नव्हती ना शिवसेना होती ना राष्ट्रवादी होती असं परांजपे यांनी स्पष्ट केलंय. या सर्व कारणांमुळे वाढलेले मतदान हे नेहमीच लोकसभेनंतर विधानसभेला वाढलेले असते. भारतात कोविडमुळे दुर्दैवाने 2020 च सेन्स झालं नाही. यामुळे आकडेवारीमध्ये तफावत असू शकतेलोकसभेला जी मतदान केंद्र होती, त्यापेक्षा प्रत्येक विधानसभेमध्ये 25 ते 30 मतदान केंद्र अधिकची निवडणूक आयोगाने वाढवली.
महाराष्ट्रात विशेषतः शहरी भागामध्ये अनेक मोठ्या गृह संकुलात मतदान केंद्र यावेळी करण्यात आले. त्यामुळे मतदारांची यादी देखील वाढली आणि मतदार यादी देखील इकडे तिकडे झाल्यात असं परांजपे म्हणाले आहेत.
राजकारणातील पोरकटपणा…फक्त कॅसेट वाजवणं सुरू, प्रवीण दरेकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
पण यातून एकच दिसतंय की, दिल्लीचा पराभव स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेत मिळालेल्या यशानंतर कधीही मतदार यादीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही, अशी टीका त्यांनी केलीय. आजची पत्रकार परिषद म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार, असा टोला आनंद परांजपे यांनी सुप्रिया सुळे अन् संजय राऊत यांना लगावला आहे.