Download App

‘देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर आम्हाला….’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपशी (bjp) हातमिळवणी केल्यानंतर तेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. राज्यभरात त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. राष्ट्रवादीचे नेतेही अजितदादाच सीएम होणार, असं उघडपणे बोलत असतात. सुप्रिया सुळे यांनी तर अजितदादा मुख्यमंत्री झाले तर बहीण म्हणून पहिला हार मी घालेन, असं वक्तव्य केलं होतं. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं विधान केलं. यावर आता अजित पवारांनी भाष्य केलं.

सुप्रिया सुळे, अजितदादांबद्दलचं वादग्रस्त विधान पडळकरांना पडणार महागात; बजावली कायदेशीर नोटीस 

आज एका कार्यक्रमात बोलतांना बावनकुळेंनी 2024 मध्ये अजित पवारच मुख्यमंत्री पाहिजेत,असं विधान केलं होतं. याविषयी अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर आम्हाला वाईट वाटण्याचे कारणच नाही.

चंद्रशेखर बावनकुळेंनी काय बोलावं, हा त्यांचा अधिकार आहे. शेवटी निर्णय हा जनताच घेत असते. फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर वाईट आम्हाला वाईट वाटण्याचे कारण नाही, असं अजित पवार म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या गटाचे समर्थक मुख्यमंत्री पदाबाबत जाहीरपणे भाष्य करत आहेत. तिन्ही पक्षांच्या समर्थकांची मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. जो तो आपलाच नेता मुख्यमंत्री पाहिजे, अशी विधान करत आहे. अजित पवारांनी सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिल्याने तेच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. फडणवीस यांनीही अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर पाच वर्षासाठी करू, असं विधान केलं होतं.

त्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं आणि एकनाथ शिंदेंना राज्यात ठेवावं. त्यांनंतर फडणवीस यांच्या समर्थकांनी फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजेत, अशी विधानं केली. दरम्यान, अजित पवारही मुख्यमंत्री होण्यासाठी नेहमीच तयार असतात. पण, अद्याप त्यांनी संधी मिळाली नाही. त्यामुळं ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. अशातच बावनकुळेंनी फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं विधान केल्यानं आता अजित पवार काय भूमिका घेणार हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us