Ajit Pawar on NCP Leader Sharad Pawar Resign : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देखील सोडणार असल्याची घोषणा केली. यानंतर सभागृहातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी शरद पवारांच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत तुम्ही हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही हे सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तुम्ही हा निर्णय मागे घ्या, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. सभागृहमध्ये शरद पवारांच्या नावाच्या घोषणांचा पाऊस पडला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार असे कार्यकर्ते म्हणत आहे. यानंतर अनेक नेत्यांना अश्रू अनावर देखील झाले आहेत. धनंजय मुंडे हे देखील शरद पवारांच्या पाया पडले आहेत.
Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार
यावेळी यानंतर सर्व कार्यकर्ते शरद पवारांची समजूत घालण्यासाठी व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे. तर पत्रकारांशी बोलताना अजिर पवार म्हणाले, की साहेबांनी यासाठी समिती जे ठरवेल ते त्यांना मान्य असेल असं त्यांनी सांगितलं आहे. तर ही समिती म्हणजे काही बाहेरचे लोक नाहीत. पक्ष आणि परिवारातीलच सदस्य त्यात आहेत.
त्यात मी आणि सुप्रिया देखील असणार आहोत. तसेच आता कार्यकर्त्यांनी साहेबांना घातलेली साद लक्षात घेत ही समिती निर्णय घेईल. लोकांच्या भावना लक्षात घेऊनच ही समिती निर्णय घेईल. याची मी खात्री देतो. तो साहेबांना मान्य असेल असं यावेळी अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळे आता ही समिती काय निर्णय देणार? शरद पवार निवृत्तीवर पुनर्विचार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.