Download App

चौंडीतील वादावरून अजित पवारांचे कानावर हात; म्हणाले रोहितनं…

Ajit Pawar On Rohit Pawar : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावामध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची पहाटेपासूनच लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत हा शासकीय जयंती सोहळा पार पडणार आहे.

Rohit Pawar यांच्याकडून मध्यरात्रीच अहिल्यादेवींची जयंती साजरी; राम शिंदे म्हणाले, प्रथा, परंपरा…

यावेळी चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. त्यामध्ये एकीकडे आज शासकीय जयंती सोहळा आज असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी काल मध्यरात्रीच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली.

Ram Shinde : फडणवीसांची पाठ फिरताच विखे-शिंदेंमध्ये पुन्हा ठिणगी; मी जो दावा केला तो…

त्यावर अजित पवार यांना विचारले असता त्यांनी थेट कानाला हात लावले. अजित पवार म्हणाले, ‘दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होतात. गेल्या वर्षी मी देखील त्या कार्यक्रमाला गेलो होतो. मात्र यावर्षीच्या कार्यक्रमाबद्दल मला काहीही माहिती नाही. यावर्षी तेथे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उपस्थित राहत आहेत. रोहित तेथील लोक प्रतिनिधी आहे. त्येने तिथे कोणता कार्यक्रम घेताल त्याबद्दल मला काही माहिती नाही. कारण मी काल उशीरा पर्यंत राष्ट्रपती भवनला होतो. त्यानंतर काही लोक भेटीला आले होते. त्यानंतर सीपीकार्यालयात गेलो आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळयाला अभिवादन करायचं ते झालं.’ असं म्हणत रोहित पवारांनी काल मध्यरात्री साजरी केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवर अजित पवारांनी बोलणं टाळलं आहे.

कर्जतमध्ये ट्वीस्ट ! Rohit Pawar-Ram Shinde गटाला समान जागा ! सभापती होणार कसा ?

दरम्यान एकीकडे आज शासकीय जयंती सोहळा आज असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी काल मध्यरात्रीच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. त्यावर राम शिंदे यांनी रोहीत पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ajit Pawar : फोन नाही, थेट प्रत्यक्ष भेट घेणार; जयंत पाटलांच्या विधानावर पवारांची प्रतिक्रिया

राम शिंदे म्हणाले की, शासकीय जयंती सोहळ्याच्या पत्रिकेवर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावं आहेत. त्यामुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्यासमोर नतमस्तक होणं यात गैर नाही पण प्रथा, परंपरा मोडणं वेगळ्या पद्धतीचा अवलंब करणं यावर विचार विनिमय झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली.

Tags

follow us