Shinde-Fadanvis : कसब्याचा पराभव सत्ताधाऱ्यांना चांगलाच झोंबलाय, अजित पवारांचा टोला

मुंबई : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक झाली. यापैकी कसबा या भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या आणि तब्बल 28 वर्ष तेथे भाजपची सत्ता असताना महाविकास आघाडीने निवडणूक लढवल्यानंतर रविंद्र धंगेकरांसारखा महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. 28 वर्षांनी तेथे भाजपचा पराभव झाला. हे सत्ताधाऱ्यांना अतिशय झोंबलेलं आहे. त्यामुळे ते खबडून जागे झालेले आहेत. असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे […]

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadanvis

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadanvis

मुंबई : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक झाली. यापैकी कसबा या भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या आणि तब्बल 28 वर्ष तेथे भाजपची सत्ता असताना महाविकास आघाडीने निवडणूक लढवल्यानंतर रविंद्र धंगेकरांसारखा महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. 28 वर्षांनी तेथे भाजपचा पराभव झाला. हे सत्ताधाऱ्यांना अतिशय झोंबलेलं आहे. त्यामुळे ते खबडून जागे झालेले आहेत. असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे. ते ते महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये बोलत होते.

या अर्थसंकल्पामध्ये वारेमाप घोषणा जरी झाल्या असल्या तरी महागाई आणि बेरोजगारी वाढलीय कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आलेली आहे. पोलिसांवर हल्ले होत आहेत. लोकांमध्ये सरकारबद्दल अतिशय नाराजी आहे. त्यांनी तरूणांना 75 हजार नोकऱ्या देण्याचं त्यांनी अश्वासन दिलं होतं ते ही पुर्ण केलेलं नाही. त्यामध्ये आता कामगार आणि अधिकाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा पुढे आला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. अशा सर्व समस्या असताना. आता महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांमध्ये, तरूणांमध्ये उत्साह द्विगुणित करण्यासाठी. सर्वांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. असं ही अजित पवार म्हणाले.

Kasba By Election : एका विजयाने हुरळून जाऊ नका, मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीला टोला

अशा कार्यकर्त्यांच्या बैठका ठिकठिकाणी जिल्ह्यात व्हायला हव्यात. विधिमंडळात मागण्यांवर चर्या सुरू असल्याने या बैठकीला आमदारांना बोलावण्यात आलेले नाही. त्यांची वेगळी बैठक बोलावण्यात येणार आहे. राज्यात गेल्या विधानसभा आणि विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र आल्यास काय घडू शकत हे दिसलं. सरकारबद्दलच्या भावना लाकांनी मतपेटीतून व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version