Download App

शिवतारे मागे लागले तर सळो की पळो करून सोडतात, मी त्यांचं शत्रूत्व…; अजितदादांची मिश्किल टिप्पणी

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar On Vijay Shivatare : विजय शिवतारेंनी (Vijay Shivatare) अनेकदा अजित पवारांवर (Ajit Pawar) बारामती लोकसभेवरून जोरदार टीका केली होती. आपण बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) लढवणार, असा निर्धार शिवतारेंनी केली होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी केल्यानंतर शिवतारेंनी आपली तलवार म्यान केली. त्यानंतर आता ते महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारला लागले आहेत. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विजय शिवतारेंचं कौतूक केलं.

Vijay Shivtare : ‘बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असणार’ 

सासवडमध्ये आज महायुतीचा शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला संबोधित करतांना अजित पवार म्हणाले, विजयराव एखाद्याच्य मागे लागले तर सळो की पळो करून सोडतात. मग मागचा पुढचा विचार करत नाही. मी विजयरावांचं शत्रूत्व पाहिलं. आता ते मला मैत्री काय आहे, दाखवणार आहेत, अशा शब्दात त्यांनी शिवतारेंचं कौतूक केलं.

‘लोकांनी आमची दुश्मनी पाहिली आता दोस्ती बघा’; शिवतारेंचा अजितदादांना शब्द 

पुढं बोलतांना ते म्हणाले, मी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण वर्षावर बसलो होतो. त्यावेळेस शिवतारेंनी माझा हातात घेतला आणि मला म्हणाले, तुम्ही माझं शत्रूत्व पाहिलं. आता विजय शिवतारे तुम्हाला मैत्री काय असते ते दाखवून देईल, असं सांगितलं. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की, मला काही नको, माझ्या भागातील प्रश्न सोडवावेत. भोर, पुंरदर हवेले, मुळशी, दौंड आणि इंदापूरचे प्रश्न सुटले पाहिजे. याबाबतचे त्यांनी मला निवदनं दिले. आता आता मी त्यांना शब्द देतो की, जणीचं पाणी पुरंदरला देणार, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, शिवतारेंनी भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मनात विचार येऊ लागले की, मी राज्याचा प्रमुख झालोय. भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच महायुतीचं सरकार आलंय. जीवाभावाच्या सहकाऱ्यांसाठी मी मुख्यमंत्री झालो आहे. सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतोय. मात्र, माझे सहकारी अशी भूमिका घेऊन पुढं जात असतील तर मला तरी सीएम पद कशाला हवंय? मी कोणासाठी हे करणार आहे. ही गोष्ट शिवतारेंच्या कानावर गेली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

https://www.youtube.com/watch?v=517moLwSses

अठरा पगड जातींना फक्त मोदीच न्याय देणार
आता होणारी निवडणूक ही गावकी-भावकीची निवडणूक नाही. १४० कोटी जनतेचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशातल्या राजकीय पक्षांकडे आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांकडे नजर टाकली तर देश आणि अठरा पगड जातींना न्याय देण्याचं काम फक्त पंतप्रधान मोदीचं करू शकतात, असंही अजित पवार म्हणाले.

follow us