Download App

NCP : साहेबांनंतर आता दादांनीही दंड थोपटले, दिलीप वळसे-पाटलांसाठी बनले ढाल…

राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या गटाचने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने आता शरद पवार गटाकडून दादांच्या गटाविरोधात रणनीती आखण्यात येत आहे. कालच्या बैठकीत शरद पवारांनी दादांच्या गटातील आमदारांच्या मतदारांसघात दौऱा करणार असल्याचं स्पष्ट केलं, त्यानंतर शरद पवारांच्या दौऱ्याला प्रत्युत्तरात जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे शरद पवार दिलीप वळसे-पाटलांच्याच मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्यामुळे संतप्त होत आम्हालाही भाषण करता येतं, असं प्रत्युत्तर दादांनी दिलं आहे.

देवेंद्र भुयारांनी काही तासात मारली पलटी ! अजितदादांच्या गटात पण फायदा काय ?

अजित पवारांचा गट भाजपसोबत गेल्यानंतर दादांसह इतर मंत्र्यांनी शपथविधी घेतली आहे. त्यानंतर दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आला. आपलाच गट पावरफुल आहे, असं दाखवण्यासाठी दादा आणि शरद पवार गटाकडून काल कार्यकर्त्यांची बैठकही घेण्यात आली होती. या बैठकीत दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं.

Maharashtra Politics : पार्थ पडद्याआड मात्र, धाकटे सुपुत्र जय पवार अजितदादांच्या पाठीशी

अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शरद पवारांनी आपण गुरुवारपासूनच महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच माझ्या दौऱ्याची पहिली सभा मी पुणे जिल्ह्यातील मंचर आंबेगावमध्ये घेणार असल्याचं सांगितलं. मंचर आंबेगाव हा अजितदादा समर्थक दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांना टार्गेट करुनच त्यांच्या मतदारसंघात सभा घेत असल्याचं दिसून येत आहे.

मनावर दगड ठेवून निलेश लंकेंनी निर्णय घेतला… अजितदादांच्या गोटात दाखल

दादा म्हणाले :
दिलीप वळसे पाटलांनी काय चूक केली आहे, त्यांनी आपला मतदारसंघ विकासकामांच्या जोरावर बांधला आहे. मलाही थोडे बोलता येते. भाषण करता येते. लोक माझं ऐकतात. उद्या त्यांनी दौरा सुरू केला तर, मलाही तेथे सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल. मला त्यांना उत्तर द्यावे लागेल. मी गप्प बसलो तर लोक बोलतील की याच्यात काहीतरी खोट आहे. मी खोटा नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.

Baipan Bhari Deva’ने तोडला बॉक्स ऑफिसचा रेकॉर्ड! कमाईचा आकडा पाहून केदार शिंदे म्हणाले…

माझ्यासोबत येणाऱ्या आमदारांना धमकावण्यात येत आहे. एका आमदाराला वरिष्ठांनी काय सांगितले की, तू निवडूनच कसा येतो ते बघतो. अरे, हे नेते म्हणजे तुमच्या मुलासारखे असून, त्यांनी पक्षाला याआधी साथ दिली आहे. ही भाषा दैवताने करायची, वरिष्ठांनी करायची का? शेवटी तो आमदार म्हणाला की, मला नको आमदारकी, मी घरी बसतो. कार्यकर्ता हा आपला परिवार आहे. त्याला असे बोलायचे का, माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला जिवात जीव असेपर्यत मी अंतर देणार नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर आगामी काळात राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये तीव्र होणार असल्याचं दिसून येत आहेत.

Tags

follow us