Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांनी कायम रहावे. त्यांच्या राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात येत आहे. शरद पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, अशी आम्ही त्यांनी विनंती करणार आहोत. आम्ही आता शरद पवारांची भेट घेऊन त्यांना हा निर्णय सांगणार आहोत, असा निर्णय कमिटीच्या बैठकीमध्ये झाल्याचे प्रफुल्ल पटेलांनी सांगितले आहे.
सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवण्याचा पवारांचा प्लान? मित्राकडूनच मोठा दावा
यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जयंत पाटील यांनी कमिटीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पवार साहेबच आमचे अध्यक्ष रहावे अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच शरद पवार यांनी अध्यक्षस्थानी रहावे अशी देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची देखील भावना असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपली प्रतिक्रिया न देताच बाहेर पडले आहेत. राष्ट्रवादीच्या कमिटीची मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. यानंंतर अजित पवार माध्यमांशी काहीही न बोलता बाहेर पडले ही बाब मीडियाच्या नजरेतून निसटली नाही.
यावरुन आता अजितदादा नाराज झाले आहेत का याची चर्चा आता सुरु झाली आहे. ज्यावेळी शरद पवारांनी आपली निवृत्ती जाहीर केली होती तेव्हा अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले होते. अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या होत्या. तेव्हा अजित पवारांचा सूर मात्र वेगळा होता. त्यांनी शरद पवारांच्या या निर्णयाचे समर्थन केले होते.
जयंत पाटलांचं एकाच वाक्यात ट्विट पण, ‘ते’ ठासून का सांगितलं ?
त्यांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला त्यांचा पाठिंबा असल्याचे आपल्या बोलण्यातून दाखवून दिले होते. नवीन अध्यक्ष आल्यासा त्याला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करता येईल, असे ते म्हणाले होते. यावेळी जयंत पाटील यांंना अश्रू अनावर झाले होते. पण अजित पवार मात्र शरद पवारांचा निर्णय कार्यकर्त्यांना समजावत होते.
यावेळी बोलताना अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय आपल्याला माहित असल्याचे देखील सांगितले होते. पण मात्र कमिटीने शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा व त्यांनीच अध्यक्ष रहावे, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्यादिवशी शरद पवारांचा निर्णय मान्य असलेले अजितदादा आज माध्यमांशी न बोलताचा निघून गेले आहेत. यामुळे अजितदादांच्या या मौनामध्ये काय दडलंय याची चर्चा सुरु झाली आहे.
कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष ? ; पाहा, कुणाच्या नावाला मिळाली सर्वाधिक पसंती