Download App

Pawar Vs Tumane : थेट अजितदादांवर पैसे खाण्याचा आरोप; खासदाराला दिलं तिखट प्रत्युत्तर

Ajit Pawar Speak On Krupal Tumane :

शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी (Krupal Tumane) विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पैसे घेऊन कामं केल्याचे नुकतेच गंभीर आरोप केले होते. या गंभीर आरोपांवर अजित पवारांचा चांगलाच पारा चढल्याचं दिसून आलं. या आरोपांवर बोलतानाच त्यांनी थेट कृपाल तुमाने यांच्या खासदारकीलाच खुलं आव्हान दिलं आहे. (NCP Leader Ajit Pawar Speak on Shivsena MP Krupal Tumane)

युक्रेनचा रशियावर खेरसनमधील धरण फोडल्याचा आरोप; झेलेन्स्कींनी बोलावली आपत्कालीन बैठक

अजित पवार म्हणाले, मी पैशांशिवाय काम करीत नाही, हे महाराष्ट्रातल्या एकानेही सांगितलं तर मी राजकारण सोडून देईन. कृपाल तुमानेने माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करुन दाखवावं, नाही सिद्ध केले तर खासदाराने घरी बसावं, या शब्दांत अजित पवारांनी आरोपांचं खंडन करीत तुमानेंना थेट आव्हानच दिलं आहे.

हेल्मेट घालून क्षेत्ररक्षण करणार खेळाडू! WTC फायनल ‘सॉफ्ट सिग्नल’ नंतर नवीन नियम…

तसेच कृपाल तुमाने यांनी हा असला आरोप माझ्यावर करायचं काम नाही. सर्व आमदारांना विचारा माझ्या कामाची पद्धत कशी आहे ते, उगीच उचलली जीभ अन् लावली टाळ्याला, अश खोचक शब्दांत अजित पवारांनी तुमानेंना सुनावलं आहे.

काय म्हणाले होते कृपाल तुमाने?

सध्या राज्याच्या राजकारणात सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरुच आहे.  अशात शिवसेना खासदार कृपाल तुमाणे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला. अजित पवार अर्थमंत्री असताना ते पैसे घेतल्याशिवाय काम करत नव्हते असा गंभीर आरोप तुमाने यांनी केला होता. अजित पवार यांनी ते अर्थमंत्री असताना किती खोके जमवले ते सांगावं. खोक्यांशिवाय अजित पवार काम करत नव्हते. झोपताना आणि सकाळी उठल्यावर खोके पाहणारे लोक खोक्यांवरच बोलतात, पैसे घेतल्याशिवाय दादा कामच करत नव्हते, असे आरोप तुमाने यांनी केले होते.

 

Tags

follow us