Download App

Sanjay Shirsat : पवारानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार हेच योग्य

Ajit Pawar suitable for the post of NCP President : शरद पवारांनी (Sharad Pawar) काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची निवृत्तीची घोषणा केली. शध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे 2-3 दिवसांचा वेळ मागितला आहे. मात्र, ते राजीनामा कितपत मागे घेतली, याविषयी शंका आहे. दरम्यान, पवाराच्या या निर्णयामुळं पवारांच्या जागी आता कोण राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष होणार, याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून योग्य व्यक्ती असल्याचं सांगितलं.

संजय शिरसाट यांनी पवारांच्या निर्णयावर भाष्य करतांना सांगितलं की, राजकारण हे एका दिवसात टर्निंग पॉईंटवर येत नसतं. अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला. त्यानंतर ते जेव्हा वापस आले, तेव्हा उपमुख्यमंत्री झाले. तिथून राजकारणाला सुरूवात झाली. महाविकास आघाडीत अजित पवार हे पॉवरफुल नेते मानले जायचे. कारण, चलती अजित दादांची होती. मात्र, अजित पवारांना अंतर्गत विरोध सुरू झाला. तर काहींना अजित पवार हेच पक्ष चालवू शकतात, असं वाटतं होतं. नंतर ते राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. याची काही पार्श्वभूमी पवारांच्या निर्णयाला असू शकते, असं शिरसाट म्हणाले.

पवार हे आजही वयाच्या 82 व्या वर्षी लाजवेल असं काम करतात. रोजच्या पेपरात त्यांचं नाव असतं. त्याचं कामं असतं. वयाचा विचार करत कुठंतरी थांबलं पाहीजे, असं पवार सांगतात. वयामुळं त्यांनी हा घेतलेला निर्णय तो योग्य आहे. पण राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहातून निर्णय घेतला असेल तर हे वाईट आहे, असं शिरसाट म्हणाले.

MLA Nilesh Lanke : निर्णय बदलण्यासाठी मुंबईला जाऊन पवारांचे पाय धरणार, त्यांना गळ घालणार

राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होईल, या प्रश्नावर बोलतांना शिरसाट म्हणाले की, शरद पवारांनी प्रत्येक कार्यकर्ता जपला. त्यांचं आपल्या कार्यकर्त्यांवरच प्रेम सगळ्यांनाच ठाऊक आहे. कामाच्या बाबतीतही ते वाघ आहेत. प्रत्येक मतदारसंघाची खडानखडा माहिती आहे. त्यांचा कामाचा आवाका आणि झपाटा मोठा आहे. आज तोच कामाचा झपाटा अजित पवारांचा आहे.

सकाळी आठ वाजताच मंत्रालयात बसणं आणि रात्री 10 वाजेपर्यंत काम करणं असो, कि, एखाद्या कार्यक्रमाला वेळेत हजर होणं असो, कामाच्या बाबतीत अजित पवारांचा हात कुणी पकडू शकत नहाी. त्यामुळे उद्या जर ncp अध्यक्ष कोणाला कराव, असं विषय आला, तर अजित पवार हे अध्यक्ष झाले पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना असेल, असं शिरसाट यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळेंना ncp अध्यक्षपद मिळेल का, याविषयी विचारलं असता शिरसाट यांनी सांगितले की, शरद पवार हे पुरोगामी विचारांचे नेते आहेत. त्यांनी अनेक पदे हे वेगवेगळ्या लोकांनी दिली. त्याचं इतरांसारखं नाही. ते पक्षवाढीचा विचार करतात. त्यामुळं त्यांनी आजवर अनेक माणसांना संधी दिली. त्यांच्या मनात आलं तर ते कुणालाही अध्यक्ष करू शकतात, पक्षाच्या वाढीसाठी अजित पवार हेच याोग्य आहेत.

Tags

follow us