MLA Nilesh Lanke : निर्णय बदलण्यासाठी मुंबईला जाऊन पवारांचे पाय धरणार, त्यांना गळ घालणार

MLA Nilesh Lanke : निर्णय बदलण्यासाठी मुंबईला जाऊन पवारांचे पाय धरणार, त्यांना गळ घालणार

Nilesh Lanka on Sharad Pawar’s decision : काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा राजकीय भूकंप घडवला. लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी NCP च्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं एकच खळबळ उडाली. पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात आक्रोश झाला. कार्यकर्ते भाऊक होऊन रडायला लागले. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, आता पवारांच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. साहेब हे आमचे दैवत आहेत. सगळेच कार्यकर्ते आणि नेते त्यांची मनधरणी करत आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना ते समजून घेतील, असा आशावाद व्यक्त करत आपला निर्णय बदलण्यासाठी मुंबईला जाऊन त्यांचे पाय धरणार असल्याचं लंके म्हणाले.

पारनेरचे आमदार असलेले लंके हे पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय आणि शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. लंके यांनी पारनेरमध्ये आजोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना दुस्तुरखुद्द पवारांनी अनेकदा हजेरी लावली होती. लंके हे शरद पवारांना आपलं दैवत मानतात. पवार यांनी काल राष्ट्रीय अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला, त्याविषयी बोलतांना लंके यांनी सांगितलं की, पवार साहेबांनी निवृत्तीचा आणि अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेऊन आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना धक्का दिला. पुस्तक प्रकाशाच्या कार्यक्रमात असे बोलतील असं कुणालाही वाटलं नाही. त्यांची बातमी टिव्हीवर पाहिल्यावर मला एकदम धक्का बसला.

Mahavir Phogat : कुस्तीपटुंच्या उपोषणाला आमीरने पाठिंबा द्यावा, फोगाट बहिणींच्या वडिलांची विनंती

कार्यकर्त्यांसाठी साहेबांनी आपला निर्णय मागे घ्यावा. कारण, साहेब हे देशातील सर्वसामान्य लोकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी उर्जास्थान आहेत. पवार साहेबांचा निर्णय हा चुकीचा असू शकत नाही. त्यांचा निर्णय हा आमच्यासाठी परमेश्वर आज्ञा आहे, असं लंके म्हणाले.

लंके यांनी सांगितलं की, आम्ही सगळे आमदार एकत्र येऊन पवार साहेबांना आपला निर्णय बदलण्यासाठी साकडं घालू. शरद पवार हे एक वेगळीच ताकत आहे. ते आमचे परमेश्वर आहेत. त्यांनी घेतलेला हा निर्णय धक्कादायक असला तरी आमची आमच्या दैवतावर नितांत श्रध्दा आहे.

लंके म्हणाले, शरद पवार हे परिस आहेत. ते वेगळी शक्ता आहेत. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार केलं. आम्ही त्यांच्याशिवाय, पक्षाची वाटचाल करायाची याचा आम्ही विचारच करू शकत नाही. ऐवढे सगळे नेते, कार्यकर्ते त्यांची मनधरणी करत आहेत, त्यांना निर्णय बदलवण्यासाठी आग्रह करत आहेत. त्यामुळं ते आपला कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आपल्या निर्णयावर विचार करतील. आता मी देखील मुंबईला जाणार आहे. आणि पवार साहेबांचे पाय धरून त्यांना आपला निर्णय बदलवण्यासाठी गळ घालणार असल्याचं लंकेंनी सांगितलं.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube