Download App

Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा

Ajit Pawar To Be CM of Mharashatra : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. मात्र, अजित पवारांनी bjp सोबत जाण्याच्या सगळ्या चर्चांना विराम दिला.

त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलतांना मोठा दावा केला होता. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात अनेक तर्क-वितर्कांना बळ मिळत आहे. यामध्ये नेत्यांच्या या मुद्द्यावरील वक्तव्यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार याला दुजोरा मिळतो. पुन्हा एकदा असंच वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे.

Sharad Pawar : अजितदादा नाराज, राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी सांगितलं सत्य काय…

मिटकरी म्हणाले आहेत की, तसे हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा तशी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण प्रशासनावर पकड असणारा, अभ्यासू व्यक्तीमत्त्व हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे असं प्रत्येकाल वाटत. तशीच आपलीही भावना आहे. त्याचबरोबर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील असं वाटत की, महाराष्ट्राचं राजकारण सांभाळेल असा नेता अजित पवार यांच्याशिवाय दुसरा सध्या नाही. त्यामुळे अजित पवारयांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र एकनाथ शिंदे तर आता सक्तीच्या रजेवर गेलेत. मात्र त्याचा आणि याचा काही संबंध नाही असेही मिटकरी म्हणाले.

दरम्यान पक्षात तरुणांना सक्रिय करायचे असेल तर त्याना पक्षात विविध पद दिली गेली पाहिजे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी पक्षात होऊ घातलेले बदल याचे संकेत दिले आहेत. चेंबूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युथ मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले तरुणांना संधी दिली गेली पाहिजे. तरुणांना पक्षात घ्यावे असे मी नेत्यांना सांगेल. जे लोक संघटनेत काम करतात त्यांना सांगण आहे की पाच ते सहा वर्ष युवक चळवळीत काम करणाऱ्यांना संघटनेत घ्या. याठिकाणी त्यांनी काम प्रस्तावित केलं तर त्यांना महापालिकेसाठी संधी द्या. अशा सूचना आपण परदेशाध्यक्ष यांना करणार असल्याचे पवार यांनी सांगितलं.

follow us