मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्या भेटीवर वक्तव्य केलं आहे. ‘राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुश्मन नव्हे. राजकीय टीका केली तरी विकास कामाबाबत चर्चा, संवाद होतचं असतो.’ असं अजित पवार यांनी सांगितलं. असं सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या पार्थ पवार–शंभूराज देसाई भेटीचं समर्थन केलं आहे. ते सांगलीतील अंजनीतील आर. आर. पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली होती. या भेटीमुळं चर्चांना उधाण आलंय. पार्थ पवार आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची भेट शंभूराज देसाई यांच्या शासकीय बंगल्यावर ही भेट झाली होते.
शंभूराज देसाई आणि पार्थ पवार यांच्यामध्ये या भेटीदरम्यान सुमारे पंधारे ते वीस मिनटं चर्चा झाल्याची माहिती आली होती. काही खासगी कामासाठी शंभूराज देसाईंची भेट घेतल्याचं पार्थ पवारांनी म्हटलं. यावेळी पार्थ आणि शंभूराज देसाई यांच्यात पंधरा ते वीस मिनिटं चर्चा झाली.
या भेटीमुळं राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी या भेटीवर मोठा दावा केला होता. पार्थ हे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ आहेत. लोकसभेत त्यांचा पराभव झालाय. या पराभवानंतर पार्थ राजकीय स्थिरतेच्या शोधात आहेत. त्यामुळं पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. मात्र आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पार्थ पवार–शंभूराज देसाई भेटीचं कारण सांगितलं.