Download App

‘हा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून…” अजित पवार संतापले; मुख्यमंत्री शिंदे धावत सभागृहात

  • Written By: Last Updated:

सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनात आज पुन्हा सत्ताधारी-विरोधी पक्ष आमने-सामने आले, त्याचं कारण ठरले विधानसभेतील मंत्र्यांची अनुपस्थिती. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार ठराव मांडत असताना समोरच्या बाकावर मंत्री उपस्थित नसल्याचं धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितलं. त्यांनी अध्यक्षाकडे तसा मुद्दा देखील उपस्थित केला.

अजित पवार ठराव मांडत असतानाच धनंजय मुंडे यांनी सभागृहात उभे राहून अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की  “जेव्हा विरोधी पक्षनेते २९३ चा ठराव मांडतात, तेव्हा किमान मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी थांबायला हवं. आत्ता इथे फक्त एक सहकारमंत्री आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे.”

Ajit Pawar : ज्या-ज्यावेळी…; अजित पवारांनी शिंदेंना करून दिली राजीनाम्याची आठवण

धनंजय मुंडे पुढे म्हणाले की,  सगळे मंत्री लॉबीमध्ये बसले आहेत. याचं सरकारला काहीही गांभीर्य नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही गांभीर्य नाही.” धनंजय मुंडे यांच्या याच मुद्द्याला विरोधी पक्षातून समर्थन दिले गेले. जयंत पाटील, छगन भुजबळ आणि नाना पटोले यांनी देखील हा मुद्दा अधोरेखित केला.

अजित पवार देखील आक्रमक

विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहताच अजित पवारही आक्रमक झाले. ते म्हणाले की अधिवेशन सुरू झाल्यापासून सरकारला गांभीर्य नाही. सत्ताधारी पक्षाचं पहिलं बाकडं कायम मोकळं असतं. आम्हीही सरकार चालवलं आहे. दरम्यान जयंत पाटील यांनीही विरोधी पक्ष बोलत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित राहण्याचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे. असं मत मांडलं

Ajit Pawar : दक्षिण भारताप्रमाणे मोठ-मोठ्या पोस्टरचे प्रमाण वाढलंय, जाहिरातीवरून अजितदादांची सरकारवर टीका

विरोधी पक्षाकडून अशी आक्रमक भूमिका मांडली जात असताना तेवढ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात दाखल झाले. त्यानंतर अजित पवार यांनी आपलं भाषण सुरु ठेवलं.

भातखळकर यांना अजित पवार यांचं उत्तर

दरम्यान भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधी पक्षाला डिवचण्यासाठी “तुमचे मुख्यमंत्री अडीच वर्षं सभागृहात कुठे उपस्थित होते?” असा खोचक प्रश्न उपस्थित केलाच. त्यावर अजित पवार यांनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणाले की,  “अतुलजी, तुम्ही नीट आठवा. सभागृहात जेव्हा गरज असायची, तेव्हा असायचेच. पण उपमुख्यमंत्री म्हणून हा अजित पवार सकाळी ९ वाजल्यापासून असायचा.”

Tags

follow us