Ajit Pawar : ज्या-ज्यावेळी…; अजित पवारांनी शिंदेंना करून दिली राजीनाम्याची आठवण
Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे विधीमंडळात चांगलेच संतापले आहेत. त्यांची आणि मंत्री शंभूराजे देसाई यांची चांगलीच खडाजंगी झाली आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला शंभूराजे देसाई यांनी उत्तर दिले. यावरुन अजितदादा चांगलेच संतपालेले पहायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे ही त्यांनी स्वत: दिली पाहिजे. अशा प्रकारे इतर मंत्र्यांनी त्याची उत्तरे देणे बरोबर नाही. मी विरोधी पक्षनेता या नात्याने त्यांना प्रश्न विचारला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना स्वत: या प्रश्नाची उत्तरे द्यायला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले आहेत.
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, बाजारात तेजी
याआधी ज्या-ज्या मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले त्यांनी राजीनामा दिला आहे. अंतुले साहेब किंवा निलंगेकर साहेब यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याप्रकरणाचे गांभीर्याने उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.
Pune-Mumbai द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, तिघांचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरभरती करण्यासाठी परवानगी दिलेली होती. या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांना स्थगिती दिली होती. त्यावरुन सहकार मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली आहे. यावरुन मंत्रीमंडळातील वाद चव्हाट्यावर आल्याचे अजितदादा म्हणाले आहेत.