‘अजित पवार निधी देत नव्हते, मग आता सोबत कसे? मुख्यमंत्र्यांनी थेटच सांगितलं…

Maharashtra Politics Ajit Pawar: गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी देखील बंडखोरी केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis government) काम करण्यास सक्रिय झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. परंतु जेव्हा शिंदे गटाने (Shinde group) […]

Ajit Pawar Eknath Shinde

Ajit Pawar Eknath Shinde

Maharashtra Politics Ajit Pawar: गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी देखील बंडखोरी केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis government) काम करण्यास सक्रिय झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे.

परंतु जेव्हा शिंदे गटाने (Shinde group) बंडखोरी केली, तेव्हा अजित पवार निधी देत नाहीत, म्हणून आम्ही बंडखोरी केली असा आरोप शिंदे गटातील नेते करत होते. तसेच अजित पवारांच्या जाचामुळेच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, असे आरोप शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी केले होते. आता अजित पवार हेच युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आपल्याला निधी न देणारे अजित पवार युतीमध्ये कसे काय? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी थेटच सांगितले आहे. अजित पवार निधी देत नव्हते, म्हणून बंड केलं. आता त्यांच्याशीच युतीत कस काय? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी थेटच उत्तर दिलं आहे, म्हणाले, “आता मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे कुठलीही तक्रार नसणार आहे, मीरा भाईंदर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केले आहे.

काँग्रेस म्हणू, काँग्रेस आणू.., अजित पवारांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस नेत्यांचं ट्विट…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा जाहीर केल्यावर काही वेळातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह इतर बडे नेत्यांनी एन्ट्री मारली आहे.

Exit mobile version