Download App

अजितदादा मुख्यमंत्री होणार; प्रफुल्ल पटेलांनी दिले स्पष्ट संकेत

Praful Patel On Ajit Pawar : अजितदादांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करुन राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसांपासून अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. संपूर्ण महाराष्ट्रभर अजितदादांच्या भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनरही लावण्यात आले. विरोधकांकडूनही त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मात्र मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तरीही त्याबद्दल अनेक नेते अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले जात आहे. आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.(Ajit Pawar will be the Chief Minister praful patel clear indication)

कर्जत एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेत नीरव मोदीची जमीन; राम शिंदेंच्या दाव्याने मोठी खळबळ

आज राष्ट्रवादी अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल याबद्दल म्हणाले की, आज जर मुख्यमंत्रिपदाची जागा खाली नसेल तर त्याबद्दल चर्चा कशाला करता. आज अजितदादा महाराष्ट्राचे नक्कीच वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे नेतृत्व अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत आहेत.

उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’

असं आहे की, कधी न कधी आज जरी नाही तर उद्या नक्कीच त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, असं असलं तरी आज ती जागा रिकामी नाही तर मग त्यावर चर्चा कशासाठी करत आहात असाही सवाल यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी केला.

राष्ट्रवादीच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी अजितदादा गटातील आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात अजितदादा भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले. त्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. विरोधकांकडूनही त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्यांवरुनही विरोधकांकडून निशाणा साधला. मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण परिवारासह भेट घेतली, त्या भेटीवरही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. असं असलं तरी अजितदादा मुख्यमंत्री होणार का हे येणाऱ्या काळात समोर येईलच.

Tags

follow us