Ajit Pawar Wishes On Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज (12 डिसेंबर) 84 वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनी आपल्या काकांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लिहिलंय की, आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; शिंदे गृहखात्यासाठी आग्रही, भाजप नेत्यांची दिल्ली दरबारी खलबतं
शरद पवार यांना 84 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सोबत सुनेत्रा पवार, (Sharad Pawar Birthday) पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आहेत. शरद पवारांच्या वाढदिवशी काका-पुतण्याची भेट होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय.
आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. pic.twitter.com/6SnkF97upb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2024
देशाला, महाराष्ट्राला समृद्धीच्या आणि संपन्नतेच्या मार्गावर नेताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचावा यासाठी तळमळीने कार्य करणारे, माझे दूरदर्शी नेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब, आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवार जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार पक्षाच्या एक्स हँडलवर एक ट्विट करण्यात आलंय. आज दिवसभर शरद पवारांच्या आयुष्यातील माहिती नसलेले क्षण ट्विट केले जाणार असल्याची माहिती मिळतेय.