Jitendra Awhad on Ajit Pawar : ‘ही शेवटची निवडणूक आहे’ असे भावनिक आवाहन केले जाईल, शेवटची निवडणूक कधी होणार काय माहीत..? असे म्हणत बारामतीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी भावनिक आवाहनांना बळी पडू नका, असा सल्ला दिला. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अजित पवारांनी आज मर्यादा ओलांडली. काकांच्या मृत्यूची वाट पाहत आहे. तुम्ही शरद पवार (Sharad Pawar) मरण्याची वाट बघा, जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी प्रार्थना करणे कितपत योग्य आहे. काकांच्या मृत्यूची वाट पाहत आहे. शरद पवार अजरामर राहतील, त्यांचे योगदान चिरंतन राहिल. तुम्ही शरद पवार मरण्याची वाट पाहता. अजित पवारांनी आज मर्यादा ओलांडली. तुम्ही भावनिक आवाहन करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील.
Lok Sabha 2024 : “..तरच आम्ही लोकसभेत भाजपसोबत राहू”; बच्चू कडूंचा कोंडी करणारा इशारा
जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुम्ही तुमची उंची ओळखा, शरद पवार कुठे आणि तुम्ही कुठे? अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग हे देखील त्यांच नाव काढतात. लाज वाटते मला तुझ्याबरोबर काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत, तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्वस्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व काही दिले तीचं कुंकू कधी पुसले जाईल याची तुम्ही वाट पाहत आहात, असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने पाहिलेले नाही.
“आतापर्यंत साहेबांचे ऐकले, लोकसभेला माझे ऐका” : अजित पवारांची बारामतीच्या जनतेला भावनिक साद
शरद पवार यांचा प्रत्येक निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे. तुमचा एक निर्णय दाखवा. अजित पवार यांनी दिल्लीतील भाषण दाखवावे. साहेबांची खरी चूक ही आहे की त्यांनी अजित पवारांना कधीच ओळखले नाही. शेवटच्या निवडणुकाची वेळ तुमच्यावर पण येईल. अजित पवारांना महाराष्ट्राचे नेते म्हणायला लाज वाटते. शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या कलंकित अजित पवाराला महाराष्ट्र आणि बारामतीची जनता कधीच पसंत करणार नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.