“आतापर्यंत साहेबांचे ऐकले, लोकसभेला माझे ऐका” : अजित पवारांची बारामतीच्या जनतेला भावनिक साद

“आतापर्यंत साहेबांचे ऐकले, लोकसभेला माझे ऐका” : अजित पवारांची बारामतीच्या जनतेला भावनिक साद

बारामती : इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझे ऐका, मी लोकसभेला उमेदवार देणार आहे, तिथे मी स्वतः उभा आहे, असे समजूनच मते द्या, माझ्या विचारांचा विचारांचा खासदार दिला तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही सांगू शकतो की माझ्या लोकांनी हा खासदार दिला आहे, आपली कामे झाली पाहिजेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीच्या (Baramati) जनतेला महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करण्याची भावनिक साद घातली. ते बारामतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. (Deputy Chief Minister Ajit Pawar gave an emotional appeal to the people of Baramati to vote for the Grand Alliance candidate.)

अजित पवार म्हणाले, बारामतीत आपण पक्षाचे पैसे घालून कामे केली आहेत. त्या बदल्यात मी तुम्हाला काहीही मागितलेले नाही. पण निवडणुकीला फक्त मी उमेदवार देणार आहे, मी जो उमेदवार देईल त्यालाच फक्त त्यालाच मतदान करा. आतापर्यंत वरिष्ठांचे ऐकले, आता माझे ऐका. उद्या माझ्या विचारांचा खासदार दिला तर माझे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत. मी त्यांनाही सांगेन की माझ्या लोकांनी हा खासदार दिला आहे. यांची कामे मार्गी लागली पाहिजेत. त्यामुळे आपली कामे झाली पाहिजेत या दृष्टीने अडी-अडचणीला कोण मदत करतो याचा विचार करुन मतदान करा.

‘मविआ’ भक्कम, आधी ‘गोळीबारा’च्या तणावाकडे लक्ष द्या’; काँग्रेस नेत्याने सत्ताधाऱ्यांना फटकारलं

मध्यंतरी मी सरकारमध्ये नव्हतो तर सगळी कामे ठप्प होती, पण मी सरकारमध्ये आल्यापासून कामे मार्गी लागली. येणाऱ्या निवडणुकीत बारामतीमध्ये जो बदल होत आहे, कामे होत आहेत, जो निर्णय मी विकासासाठी घेतला त्याला तुम्हाला पावती द्यायची असेल तर मी निवडणुकीला उभा आहे असे समजून मतदान करा. कुणी भावनिक होतील. शेवटची निवडणूक आहे म्हणतील. असेच आहे, तसेच आहे म्हणतील, त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहिती नाही. पण तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे, असेही अजित पवार म्हणाले.

‘जरांगेंच्या चेल्या-चपाट्यांनो औकातीत रहा’; धमकीच्या फोनवरुन लक्ष्मण हाकेंचा इशारा

मला तुम्हाला इतकेच सांगायचे आहे की आपल्या कामांचा वेग असाच राहण्यासाठी माझ्या विनंतीला मान देऊन सहकार्य करा. सगळ्यांनी बारकाईने विचार करा. धाडस केल्यानंतरच कामे होत असतात. तुम्ही मला योग्य सहकार्य केले तर पुढची कामे होतील, नाहीतर मी तुमची कामे करण्यास बांधील नाही हेही स्पष्टपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता तुम्ही विचार करायचा आहे की विकास आणि सुधारणा तुम्हाला अशाच वेगाने करायच्या आहेत की नाही? बारामतीसाठी आम्ही सगळेच जिवाचे रान करुन काम करता आहेत, असेही अजित पवार यांनी बारामतीकरांना सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube