पुणे : मी आधी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रविंद्र धंगेकरांना आमचा पाठिंबा आहे असं म्हटलच नाही. ते आमच्या घरी आले होते. त्यानंतर मी त्यांना फक्त शुभेच्छा देण्यासाठी व्हिडीओ केला. पण आमचा पाठिंबा हेमंत रासनेंनाच आहे. त्यामुळे मी माझा पाठिंबा हेमंत रासनेंनाच आहे. हे स्पष्टीकरण देण्यासाठीच केला. असं स्पष्टीकरण श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सदस्य अक्षय गोडसे यांनी दिलं आहे.
पुढे अक्षय गोडसे म्हणाले की, उमेदवारी अर्ज भरण्यातही मी हेमंत रासनेंसोबत होतो. त्यांचं स्वागतही मीच केलं. रविंद्र धंगेकरांना फक्त शुभेच्छा दिल्या. पण आमचा पाठिंबा हेमंत रासनेंनाच आहे. रासने कुटुंबाच आणि आमचं 70-80 वर्षांपासूनचं नात आहे. तर माझ्याकडे रविंद्र धंगेकरांचा नंबर सुद्धा नाही. माझा आणि त्यांचा जास्त संपर्क सुद्धा नाही. असं देखील अक्षय गोडसे म्हणाले आहेत.
Kasba By Election : अक्षय गोडसे यांनी घातला गोंधळ, आधी धंगेकरांना नंतररासने यांना पाठिंबा
पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्यावरुन श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सदस्य अक्षय गोडसे गोंधळ घालत असल्याचं दिसून आलं होत. अक्षय गोडसे यांनी आधी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा दिला होता. आता भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, अक्षय गोडसे यांनी काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या प्रसारितही झाल्या होत्या. भाजपचे उमेदवार हेमंत रासने देखील दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे पदाधिकारी आहेत. हा ट्रस्ट आत्तापर्यंत एकजुटीने राजकीय भूमिका घेत आला. अक्षय गोडसेंनी रविंद्र धंगेकरांना पाठिंबा दिल्यानंतर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यामंध्ये फूट पडल्याचे दिसून आलं होतं.