Download App

Ambadas Danve एकातरी आमदारावर देशद्रोहाचा गुन्हा असल्याचे सिद्ध करा… अन्यथा माफी मागा

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी अर्थ संकल्प अधिवेशनापूर्वी (Budget Session) मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. याबाबतची भूमिका ऱाज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत मांडली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बरे झाले चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. अन्यथा आम्हाला देशद्रोहांबरोबर चहा प्यावा लागला असता, असे वक्तव्य केले. त्यावर राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विधीमंडळात बसणाऱ्या एकातरी आमदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याचे सिद्ध करा. अन्यथा आमदारांबरोबरच महाराष्ट्राची माफी मागा, असे आव्हान दिले आहे. तसेच देशद्रोहाचा गुन्हा काय असतो, त्याचे कलम काय असतात याची माहिती घेत जा आणि मग बोलत जा, असा टोला अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

Ajit Pawar : सरकारने काय-काय केलं बंद ? ; संतापलेल्या अजितदादांनी सभागृहात यादीच वाचली

राज्य़ विधीमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सोमवार (दि. २७) पासून सुरु झाले. तत्पूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर निशाणा साधला. अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी आणि इतर ४० आमदारांनी खरंतर महाराष्ट्रद्रोह केला आहे. त्याबद्दल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला हवी. ते न करता राज्यातील जनतेना निवडा दिलेल्या आमदारांवर खोटा आरोप करत आहे.

Ambadas Danve : शेतकरी वाऱ्यावर… राज्य सरकार मुंबई, महाराष्ट्राला लुटतेय!

अंबादास दानवे म्हणाले की, आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोह कशाला म्हणतात याची माहिती घ्यावी. मग नंतरच बोलावे. त्यांला कायद्याचे ज्ञान कमी आहे. देशद्रोहाचे कलम काय आहे. ते कोणावर लावले जाते. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असणाऱ्या व्यक्तीला अले खुलोआम फिरता येते का, तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेला व्यक्ती, आमदाराला राज्याच्या सर्वोच्च सभागृहात असे बसता येते का, आणि तुम्हाला जर एखाद्या आमदारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करायला हवी, असे आव्हान अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

Tags

follow us