Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या परदेश दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. सीएम शिंदे 1 ऑक्टोबरपासून दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र अचानक हा दौरा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शिंदे यांच्याबरोबर जाणार होते. ठाकरे गटाने यावर प्रतिक्रिया देत शिंदे यांची कोंडी केली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackray) यांनी या दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्याची सरकारला भीती आहे. त्यामुळेच हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले आहेत.
दानवे म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी या परदेश दौऱ्याविषयी प्रश्न उपस्थित केले होते. हा दौरा का होतो?, कसा होतो? या दौऱ्याचा खर्च कुणाकडून केला जात आहे? हा दौरा कशासाठी होतोय?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. जर आदित्य ठाकरेंनी हे प्रश्न उपस्थित केले नसते तर हा दौरा झाला असता. हिंदी सिनेमात एक डायलॉग आहे. ये डर अच्छा है. ही तशीच परिस्थिती आहे असे दानवे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
Sanjay Raut : ‘आमचा नाही, न्यायालयाचाच दबाव’; राणेंच्या आरोपांवर राऊतांचं थेट उत्तर
विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. काल सुनावणी झाली. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी या प्रकरणात दाखल याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्यायची की एकत्रित याचा निर्णय राहुल नार्वेकर घेतील असे सांगितले जात आहे. यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे, असे दानवे यांना पत्रकारांनी विचारले त्यावर दानवे म्हणाले, मला असं वाटत नाही की सुनावणीमुळे दौरा पुढे ढकलला गेला असावा. पण, यामागे काहीना काहीतरी कारण नक्कीच आहे.
देशाला आणि राज्याला गुंतवणूक मिळवून देणाऱ्या दौऱ्यांना आमचा आक्षेप नाही. पण, त्यांचा हा दौरा दावोसच्या सहलीसारखा असू नये. दावोस दौऱ्यात फक्त 28 तासांसाठी राज्य सरकराने तब्बल 40 कोटी रुपये खर्च केले होते. या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं नव्हतं. दौऱ्याचे कुठेही फोटो नव्हते. इतकच नाही तर सरकार अजूनही या दौऱ्याचे सरकारी आकडे लपवत आहे.
Sanjay Raut : 2024 च्या आधी भाजप फुटणार! NDA फक्त नौटंकी; राऊतांचा दावा