Download App

विधानसभेसाठी ठाकरे गटाची आघाडी, 60 शिलेदारांची यादी तयार, विश्वासू नेत्याची माहिती…

ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (UBT) 60 उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली

  • Written By: Last Updated:

Ambadas Danve on Vidhansabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात मनसेने (MNS) निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची घोषणा केली आहे. आता ठाकरे गटाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (UBT) 60 उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली आहे. नवरात्रीच्या दरम्यान, पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘…तर जानेवारीत पगारालाही पैसे राहणार नाहीत; राज ठाकरेंचा लाडकी बहिण योजनेवरून इशारा 

विधानसभेच्या 288 जागांसाठी दीपावलीनंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली. दरम्यान, अंबादास दावने यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ठाकरे गटाच्या 60 उमेदवारांची यादी तयार आहे. या यादीत नाव असलेल्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या, नवरात्रीच्या काळात पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर येथील भाजप पदाधिकारी ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचा दावाही दानवेंनी केला.

अंगावर फक्त पट्टे ओढून कोणी वाघ होत नाही खरा वाघ मातोश्रीवर, दानवेंचा CM शिंदेंना टोला 

पुढं बोलतांना दानवे म्हणाले की, ठाकरे सेनेची 288 जणांची यादी तयार आहे. अनेक ठिकाणी एक, दोन किंवा तीन जणांची नावे आहेत. आमच्या पक्षाची यादी तयार असते. सगळे सर्व्हे, सगळी माहिती, संपर्कप्रमुख, विधानसभा प्रमुख, जिल्हा प्रमुख अशा सर्वांसोबत उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक बैठका घेतल्या आहेत. तिथला अंदाज घेतला आहे, असं दानवेंनी सांगितलं.

दानवे म्हणाले, गेल्या वेळी आम्ही विधानसभेच्या 60 जागा जिंकल्या होत्या. सध्या कोणताही पक्ष अधिकृतपणे काहीही बोलत नाही, उमेदवाराने ते समजून घ्यायचं असतं की, आपल्याला निवडणूक लढवायची आहे. शिवसेनेत अनेकांनी समजून घेत कामाला लागले आहेत, असंही दानवे म्हणाले.

follow us