Download App

NCP : अमोल कोल्हेंचे 24 तासांत घुमजाव; पवारांना भेटले पण राजीनामा न देताच माघारी फिरले

Amol Kolhe Letter To Sharad pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्षात (NCP) फूट उभी फुट पडली आहे. अजित पवारांसह 9 मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार हजर होते. त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही (Amol Kolhe) सहभाग होता. त्यामुळे कोल्हेंविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर काल त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे ट्विट केलं होतं. एवढचं नाहीतर, तर आपण आपला राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचंही सांगितलं. दरम्यान, आ त्यांनी पवारांना लिहिलेल्या पत्रात राजीनाम्याचा विचार करत आहे, कृपया मार्गदर्शन करावं, असं म्हंटलं आहे. त्यामुळे त्यांनी उण्यापुऱ्या २४ तासाचंत घुमजाव केलं. कोल्हे पवारांना भेटले मात्र राजीनामा न देताच माघारी फिरलेत. (Amol Kolhe Letter To Sharad pawar i am thinking of resigning please guide me)

रविवारी अजित पवारांनी थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन त्यांनी शिंदे -फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यानंतर लगेच त्यांनी राष्ट्रवादीवरही दावा ठोकला. मात्र, आपला अजित पवारांना पाठिंबा नसल्याचं पवारांनी सांगितलं. त्यामुळं शरद पवार विरुध्द अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. दरम्यान, रविवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे अजित पवार यांच्यासोबत दिसले. त्यानंतर कोल्हेंही अजित पवारांसोबत आहेत, असा मेसेज गेला. त्यानंतर काल कोल्हेंनी शपथविधीच्या हजेरीवर भाष्य केलं होतं. मी वेगळ्या कामासाठी अजित पवारांकडे गेलो होतो. तिथं गेल्यावर भाजपबरोबर जावं लागू शकतं, असं कानावर घालण्यात आलं. मात्र, लगेच शपथिविधी आहे, हे माहीत नव्हतं. मी शरद पवारांसोबतच आहे, असं त्यांनी सांगितलं. इतकचं नाही तर मतदारांनी मला एका विचारधारेवर विश्वास ठेऊन मतदान केलं. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आता राजीनामा देणार असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं. दरम्यान, आज ते शरद पवारांना भेटले. त्यांनी पवारांना पत्रंही दिलं.

Shiv Sena : अजितदादांच्या एन्ट्रीनंतर शिंदेंच्या शिवसेनेला हादरे; आमदारांना परतीचे वेध 

या पत्रात कोल्हेंनी लिहिलं की, आपण माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीला लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. जनतेचे, शेतकऱ्यांचे, राज्याचे, देशाचे प्रश्न मांडण्याची संधी दिली. तसेच मी प्रतिनिधित्व करत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शनही केले, त्याबद्दल मनापासून आभार!

कोल्हे पुढं लिहितात, सध्याची राजकीय परिस्थिती पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले. पक्ष फोडणे, आमदारांची पळवापळवी, काहीही करून सत्ता मिळवण्याचा अट्टाहास हे सर्व पाहून लोकशाहीतील तत्त्व, मूल्य, लोकप्रतिनिधींची जबाबदारी, उत्तरदायित्व, नैतिकता आणि विश्वासार्हता या गोष्टींविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. जर असं चित्र असेल तर सर्वसामान्य मतदारांनी ठेवलेल्या विश्वासाच काय? आणि सुशिक्षित तरुणाईच्या मनात राजकारणाविषयी आणि एकूणच लोकशाही प्रणाली विषयी अनास्था निर्माण करण्याचं पाप या महाराष्ट्रात केवळ सत्तेसाठी घडविण्यात येणाऱ्या घटना करतील याचे शल्य मनाला बोचत आहे.

ते म्हणाले, साहेब, कलाकार म्हणून काम करताना मी सर्वाधिक भूमिका छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या केल्या आहेत. 350 वर्षानंतर नैतिक अधिष्ठान असलेलं स्वराज्य निर्माण करूनही त्या स्वराज्याला माझं नाही तर रयतेच स्वराज्य’ म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श मनात ठेवून मी राजकारणात आलो परंतु स्वराज्याच्या उदात्त ध्येयासाठी वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेधे यांच्याऐवजी सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाणारी सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय संस्कृती मनाला पटत नाही, आणि म्हणूनच नैतिकतेच्या पार्श्वभूमीवर मी माझा खासदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत आहे. या सर्व निराशाजनक परिस्थितीत आपण आशेचा एकमेव किरण आहात. पदाचा मोह न बाळगता लोकशाही मूल्ये टिकवण्याच्या आपल्या संघर्षात एक कार्यकर्ता म्हणून निश्चित सहभागी असेन, असं कोल्हेंनी लिहिलं.

 

 

Tags

follow us