Download App

अमोल कोल्हे नाराज? पक्षांतराच्या प्रश्नावर म्हणाले…

  • Written By: Last Updated:

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस चे खासदार अमोल कोल्हे पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराज असल्याच्या बातम्या जोर धरत आहेत. सध्या महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यक्रम तसेच बैठक होत आहेत. परंतु या सर्व बैठक व कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे हजर राहताना दिसत नाहीत. अशातच अमोल कोल्हे यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. त्यामुळे कोल्हे नाराज असल्याच्या बातम्या अधिक जोर धरू लागल्या आहेत.

https://youtu.be/usfXieI_Xeo

यावर स्पष्टीकरण देताना कोल्हे म्हणतात नियोजित कार्यक्रमामुळे राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे नाराज असण्याचा संबंधच येत नाही. मी राजकारणांबरोबर कला क्षेत्रात देखील आहे. आणि जर कला क्षेत्राची,कलेची काही कमिटमेन्ट असेल किंवा नाटकाचा प्रोयोग असेल तेव्हा मी राजकीय कार्यक्रमाला अनुउपस्थित असतो असे यावेळी अमोल कोल्हे म्हणाले ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

युपीआय वापरणाऱ्यांसाठी मोठा धक्का; व्यवहारांवर द्यावे लागणार चार्जेस 

माझ्यासारखा शेतकरी कुटूंबातील सवर्वसामान्य माणूस आज लोकसभेत आहे तो केवळ शरद पवार साहेबांमुळे त्यामुळे पक्षावर नाराज असल्याचे कारणच येत नाही. मराठी चित्रपती सृष्टीतील मी असा एकटाच कलाकार आहे. जो एकाचवेळी राजकारण आणि चित्रपट सृष्टीत सक्रिय आहे. ही परंपरा दक्षिण भारत आणि बोजपुरीमध्ये अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मला दोन्ही कडे हजर राहता येत नाही.

 

 

 

 

Tags

follow us