Download App

मुंब्र्यात जाऊन आव्हाडांना अवकात दाखवू, ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल मिटकरी संतापले…

जितेंद्र आव्हाडला बारामतीत बोलावून घ्यावं आणि पायातलं पायतान काडून त्याचं थोबाड रंगवावं. अन्यथा, आम्ही मुंब्रा-कळव्याला जाऊन आव्हाडला त्याची अवकात दाखवू,

  • Written By: Last Updated:

Amol Mitkari : विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केली. अजित पवारांचा पक्ष म्हणजे पाटिकटमारांची टोळी असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली. एवढचं नाही तर तुम्ही मर्दाची औलाद होता, तर मग तुम्ही स्वत:चं वेगळं निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती, असं आव्हाड म्हणाले. त्यांच्या या विधानामुळं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, आव्हाडांच्या टीकेनंतर आता अजित पवार यांचे निकटवर्तीय अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘एक तुतारी द्या मज आणुनि, विकासासाठी अन् विजयासाठी…’, बापूसाहेब पठारेंनी फोडला प्रचाराचा नारळ 

अमोल मिटकरी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना मिटकरी यांनी आव्हाडांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, खालच्या भाषेत बोलण्याची जितेंद्र आव्हाडची संस्कृती आहे. ‘विंचवाची नांगी तैसें दुर्जन सर्वांगी’ या अभंगाच्या ओळीत म्हटल्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड हा दुष्ट व्यक्ती आहे. त्याच्या नसानसात विष भरलं आहे. अजित पवारांच्या वडिलांबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल (अजित पवार) आव्हाडने ज्या पद्धतीने टीका केली आहे, ते पाहता मला वाटतं की, त्यालाही त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. शरद पवारांनाही खरेच वाटत असेल की, जितेंद्र आव्हाडने अनंत पवारांचा अपमान केला तर त्यांनी जितेंद्र आव्हाडला बारामतीत बोलावून घ्यावं आणि पायातलं पायतान काढून त्याचं थोबाड रंगवावं. अन्यथा, आम्ही मुंब्रा-कळव्याला जाऊन आव्हाडला त्याची अवकात दाखवू, असा इशारा अमोल मिटकरींना दिला.

Vidhansabha Election : चंद्रकांत पाटलांना बहुमताने निवडून आणणार, अमोल बालवडकरांचा फडणवीसांना शब्द… 

आव्हाडांच्या मेंदूला लकवा मारला…
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. आव्हाड यांच्या मेंदूला लकवा मारला आहे असा टोला ठोंबरे यांनी लगावला. आव्हाड हे घरभेदी असून शरद पवार आणि अजित पवार यांना दूर करणाऱ्यांमध्ये आव्हाड हे प्रथमस्थानी होते, असा गंभीर आरोपही ठोंबरे यांनी केला.

आव्हाड नेमकं काय म्हणाले?
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा येथील सभेत अजित पवारांवर बोलतांना वादग्रस्त वक्तव्य केलं. अजित पवारांचा पक्ष म्हणजे पाटिकटमारांची टोळी असल्याचं आव्हाड म्हणाले. जर तुमच्यात हिम्मत होती, तुम्ही मर्दाची औलाद होता, तर मग तुम्ही स्वत:चं वेगळं निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती. मग आम्ही तुम्हाला मर्द समजलो असतो. ज्या काकांनी पक्षाची स्थापना केली, तो देशभर पसरवला. त्या पक्षाला तुम्ही माझं माझं म्हणत हिसकावून घतेलं. पण, जनतेला सत्य माहित आहे.

follow us