Vidhansabha Election : चंद्रकांत पाटलांना बहुमताने निवडून आणणार, अमोल बालवडकरांचा फडणवीसांना शब्द…

  • Written By: Published:
Vidhansabha Election : चंद्रकांत पाटलांना बहुमताने निवडून आणणार, अमोल बालवडकरांचा फडणवीसांना शब्द…

Amol Balwadkar: कोथरूड विधानसभा मतदारसंघात (Kothrud Assembly Constituency) भाजपने (BJP) पुन्हा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. बालवडकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असा निर्धार केला होता. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली होती. मात्र, बालवडकरांचे बंड शमवण्यात भाजप नेत्यांना यश आलं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटी यांना बहुमताने निवडून आणणार, असा असं खुद्द बालवडकर यांनी म्हटलं.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या ; संभाजीराव पाटील निलंगेकरांनी साधला थेट मतदारांशी संवाद 

अमोल बालवडकर हे भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. तशी त्यांनी जोरदार तयारी देखील केली होती. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि समाजपयोगी उपक्रमातून बालवडकर मतदारसंघातील घराघरात पोहोचले होते. मात्र बालवडकर यांचे तिकीट नाकारत भापजने पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर बालवडकर यांनी बंडाची भूमिका घेतली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. मात्र त्यानंतरही बालवडकर निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले. दरम्यान, आज बालवडकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले, नेत्याचा आदेश “सर आँखो पर आहे, असं म्हणत त्यांनी निवडणुकीत चंद्रकांत पाटलांचे काम करण्याची भूमिका घेतली.

मनोज जरांगे सुपारी घेवून तुतारी वाजवणार आहेत का? लक्ष्मण हाके आक्रमक 

बालवडकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, संघटन मे ही शक्ती है। आज माझे नेते महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली.. आदरणीय देवेंद्र जी यांची प्रत्येक भेट ही प्रेरणा देणारी असते, आजची भेट ही तशीच प्रेरणादायी! १० वर्ष पक्षाचे तन मन धनाने अथक काम केल्यानंतर मी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरुड मतदारसंघातून इच्छुक होतो.. त्यानंतर देवेंद्र जी फडणवीस यांच्या माध्यमातून माझ्या इच्छेचा सन्मान करून निवडणुकीत आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले, नेत्याचा आदेश “सर आँखो पर”, असं बालवडकर यांनी लिहिलं.

याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र यांनी आज भेट दिली, संघटन हीच शक्ती आहे आणि भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांच्या कार्याचा योग्य वेळी योग्य तो सन्मान केल्या जाईल, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचं बालवडकर यांनी लिहिलं.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघ येथून चंद्रकांतदादा पाटील यांना बहुमताने निवडून येण्यासाठी अथक परिश्रम करण्याचा शब्दही देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचं बालवकडकर म्हणाले.

दरम्यान, कोथरूडमध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना रिंगणात उतरवले आहे, तर मनसेकडून किशोर शिंदे कोथरूड मतदारसंघात आपलं नशीब आजमावत आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube