अजितदादा-सुप्रिया सुळेंच्या एकत्र येण्यावर अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले आषाढीपर्यंत…

Amol Mitkari on Ajit Pawar and Supriya Sule toghter : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती करणार आहेत. त्याचबरोबर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला […]

Ajit Pawar : 'नियम मोडला, कारवाई तर होणारच'; सुळेंच्या निलंबनावर अजितदादांचं परखड भाष्य

Ajit Pawar : 'नियम मोडला, कारवाई तर होणारच'; सुळेंच्या निलंबनावर अजितदादांचं परखड भाष्य

Amol Mitkari on Ajit Pawar and Supriya Sule toghter : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती करणार आहेत. त्याचबरोबर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

गेले काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिले जात होते.यावर नुकतंच स्वतः शरद पवार यांनी बोलताना म्हटलं होतं की अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय हा सुप्रिया सुळे घेते त्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एक गौप्यस्फोट केला आहे त्यांनी म्हटले आहे की,पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत ही अजित पवारांनी सुप्रिया सुळे हे भाऊ-बहीण एकत्र येऊ शकतात.

आधी झालं जोरदार स्वागत नंतर बेदम मारहाणीत नवरदेवाचा मृत्यू; लग्न सोहळ्यातील धक्कादायक घटना

दरम्यान दुसरीकडे आता लवकरच म्हणजे 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. या तारखेला पक्षाच्या मेळाव्या पासून अनेक पक्ष संघटना मजबूत करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. याच कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या एकत्र येण्याबाबत बोलताना अमोल मिटकरी यांनी असं देखील म्हटलं की, पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातच याबाबतचे काही संकेत मिळू शकतात. असं सुतोवाच मिटकरी यांनी केला आहे.

Exit mobile version