Amol Mitkari : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस आणि ठाकरे गटाचे विधानसभेत संख्याबळ कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा काँग्रेसचा मोठा भाऊ असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी केला होता. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी हे वक्तव्य करून ठाकरे गट आणि काँग्रेसला सूचक संकेत दिले. दरम्यान, आता अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. आता सर्वांचे डीएनए टेस्ट करावे लागतील, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
राऊत म्हणाले की, कोण लहान, कोण मोठा यासाठी एकदा सगळ्यांचे आम्ही डीएनए टेस्ट करू. मधल्या काळात शिवसेना-भाजप युतीमध्ये देखील कोण लहान भाऊ मोठा भाऊ? हा विषय आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की, डीएन टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येक जण, प्रत्येक आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही भूमिका मांडावी लागते, असं ते म्हणाले.
आता राऊत यांच्या या वक्तवयाबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विट करत म्हटले की तुमच्या पक्षातील वाचाळवीरांना लगाम घाला अन्यथा VDO लावावे लागतील.
NCP मोठा भाऊ : अजितदादांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात, आता डीएनए टेस्टची गरज!
मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात… आदरणीय उद्धवजी,आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे, विनंती ही की आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. रा.कॉ.पक्ष संकटकाळात आपल्या सोबत उभा राहिलाय . गल्लीतील टुकार “दादाहो “राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही VDO लावावे लागतील.
आदरणीय उद्धवजी,आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे,विनंती ही की आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. रा.कॉ.पक्ष संकटकाळात आपल्या सोबत उभा राहिलाय . गल्लीतील टुकार “दादाहो “राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही VDO लावावे लागतील.@uddhavthackeray@AUThackeray
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 21, 2023
काही दिवसाआधी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता संजय राऊत यांनी शिवसेना 19 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, असं वारंवार सांगत आहेत. त्यामुळं आगामी काळात जागा वाटपावरून मविआ बिघाडी निर्माण होण्याची शक्यता असल्यचां बोलल्या जात आहे.