Download App

Anil Desai : शिवसेनेच्या घटनेबद्दलचा ‘तो’ दावा चुकीचा!

मुंबई : शिवसेना पक्षाची (Shivsena)घटना अयोग्य आहे, हा दावाच मुळात चुकीचा आहे. शिवसेनेची घटना ही दर पाच वर्षांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे पक्षप्रमुखांपासून ते नेते उपनेते यांची रितसर निवडणूक घेतली जात असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई (Anil Desai)यांनी सांगितले. आज शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ठाकरे गटाचे विविध नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना नेते अनिल देसाईंनी (Anil Desai)शिवसेनेची घटना अयोग्य असल्याच्या दाव्यावर आपली बाजू स्पष्ट केली.

यावेळी देसाई म्हणाले की, दर पाच वर्षांनी पक्षाची निवडणूक घेतली जाते. निवडणूक होण्याअगोदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. शिवसेना पक्षप्रमुख ते नेते उपनेते पदांसाठी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले जातात.

त्यानंतर त्या-त्या पदासाठी एकच अर्ज आल्यास ती निवडणूक बिनविरोध होते. हा सर्व तपशील निवडणूक आयोगाला कळवला जातो. त्यानंतर प्रस्ताव, अनुमोदक सर्व कायदेशीर, लोकशाही प्रक्रिया पार पाडून पक्षांतर्गत निवडणूक घेतली जाते.

वाचा बातमी : Uddhav Thackeray : निवडणूक आयोगात आमची बाजू मजबूत, शिंदे गटाकडून दिशाभूल

पुढे राजकीय सामाजिक प्रस्ताव अशा पद्धतीनेच पार पाडले जातात. आम्ही या सर्व गोष्टींची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाते. या सर्व प्रक्रियेची माहिती आणि त्यावर निवडणूक आयोगानं आजवर शिक्कामोर्तब वेळोवेळी केल्याचंही यावेळी सांगितलं आहे. निवडणूक आयोगात आजवरची सर्व माहिती दिलेली आहे, असंही यावेळी सांगितलंय.

Tags

follow us