Download App

14 महिन्यांचा जेल भत्ता खाल्लाय, अनिल देशमुख यांचा वेगळाच अंदाज

Anil Deshmukh on Nagpur Rally : नागपूर शहरात (Nagpur Rally) आज महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) वज्रमूठ सभा होत आहे. या जाहीर सभेतून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भाजप आणि शिंदे गटाला आव्हान दिले आहे. 14 महिन्यांत जेलचा भत्ता खाऊन खाऊन मी बाहेर आलोय. अब कोई माय का लाल अनिल देशमुख को मैदान में आने से रोक नहीं सकता, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना मला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आलं. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर दबाव टाकून माझ्यावर 100 कोटींचा आरोप करण्यात आला. ते आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना विनंती केली तुम्ही चौकशी करा आणि सत्य बाहेर काढा. केंद्राने एक वर्ष ईडी, सीबीआयकडून माझी चौकशी केली. पण त्या चौकशीनंतर हायकोर्टाने निकालात सांगितले की अनिल देशमुखांवर झालेले आरोप ऐकीव माहितीच्या आधारवर आहेत. कोणतेही पुरावे नाहीत. ज्यांनी आरोप केले आहेत ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्यावर कोणताही विश्वास ठेवता येणार नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मंतिमद; ठाकरे गटाच्या नेत्याची सडकून टीका

माझ्यावर 100 कोटींचा आरोप केला होता पण 1 कोटी 71 लाखांची चार्जशीट दाखल करता आली. यावर कोर्टाने विचारले की तुमच्याकडे याचे पुरावे आहेत का? तर ज्याने आरोप केले होते तो कोर्टात आला नाही देशाबाहेर पळून गेला. 14 महिने अर्थररोड जेलमध्ये राहिलो आहे. या 14 महिन्यांत जेलचा भत्ता खाऊन मी बाहेर आलोय. अब कोई माय का लाल अनिल देशमुख को मैदान में आने से रोक नहीं सकता, अशी टीका करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

संभाजीनगरची विराट सभा पाहून पायाखालची वाळू सरकल्याने नागपुरातील सभेला विरोध झाल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. राज्यात अवकाळी होऊनही शेतकऱ्यांना मदत झाली नाही. फळबागांचे नुकसान होऊनही मदत झाली नसल्याचे आमदार अनिल देशमुख म्हणाले. राज्यात उद्योगधंदे येत नसल्याचे ते म्हणाले.

Tags

follow us