Download App

भुजबळांना फडणवीसांनीच जरागेंच्या विरोधात उभं केलं, अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप

  • Written By: Last Updated:

Anjali Damania : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली. मात्र, जरांगे पाटलांच्या मागण्यांना ओबीसी नेत्यांनी विरोध केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. भुजबळांनी दगडाचा देव झाला, जरांगे पाचवीही शिकले नसतील, सासऱ्याच्या घरी तुकडे मोडतो, अशी एकेरी टीका केली. यावर आता अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी प्रतिक्रिया दिली.

नरेंद्र मोदींनाही डीपफेकचा फटका, युजर्संना दिला महत्त्वाचा सल्ला 

मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला. ओबीसींनी मराठा आरक्षण ओबीसीमधून देण्यास विरोध करायला सुरूवात केली. मात्र, आरक्षणशिवाय, मागे हटणार नाही, असं जरांगेंनी ठणकावलं. दरम्यान, आज अंबडच्या सभेत बोलतांना मंत्री भुजबळांनी जरांगेंवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी ट्वीट करत लिहिलं की, कुठंतरी असं वाटतं की, भुजबळांना फडणवीसांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी उभं केलं आहे. आता तवा तवाने भुजबळ कसे बोलतात पाहा… आता छातीत कळ नाही येत? जेलमधून बाहेर येण्यासाटी अगदी गरीब बिचारे बनण्यचाा आव आणायचे, असं दमानियांनी म्हटलं.

State Excise Recruitment 2023 : उत्पादन शुल्क विभागात नोकरीची संधी, महिन्याला मिळणार १ लाखाहून अधिक पगार 

नेमकं भुजबळ काय म्हणाले?
भुजबळांनी जरांगेंवर जहरी शब्दात टीका केली. त्यांचा एकेरी उल्लेख करत कोणाचे खात, कोणाचे खाता, असं म्हणतो, पण, तुझे खातो काय रे? तुझ्याप्रमाणे सासऱ्यांच्या घरी तुकडे मोडत नाही, आरक्षण काय ते समजून घे. महाराष्ट्रातील अनेक नेते मराठा नेते आहेत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन चालायचे. घर जाळण्याचा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला नाही. मराठा तरुणांना सांगायचं की, याच्या मागं कुठं लागले, या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला. या कळेना, ना वळेना, अशी टीका भुजबळांनी केली.

दरम्यान, भुजबळांनी केलेल्या टीकेनंतर दमानिया यांनी छगन भुजबळांना फडणवीसांनीच जरांगे पाटलांविरोधात उभं केलं, असं विधान केलं. त्यांच्या या विधानामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता यावर फडणवीस काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us