Anjali Damania’s attack on Sunil Tatkare’s invitation accepted by Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत. एकीकडे पालकमंत्री पदाच्या सेटींगसाठी तेथे शाह जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी बहात्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून टीका केली.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
कितीही मोठा घोटाळा करा? काही प्रॉब्लेम नाही. 72 हजार कोटींचा सिंचन घोटाळा आठवतो का? त्याचं पुढं काय झालं काहीच नाही ना? कारण आपलं थर्ड क्लास राजकारण घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती. फक्त धमकी देऊन महाराष्ट्रात सत्ता आणायची होती. आता त्याच तटकरेंच्या घरी गृहमंत्री जेवायला जाणार. अतिउत्तम. ईडी, एसीबी आता गुंडाळून टाका. असे या पोस्टमध्ये दमानिया म्हणाल्या आहेत.
दरम्यान अमित शाह हे तटकरेंच्या निवासस्थानी भेट देणार असल्याने शिंदे गट आणि मंत्री भरत गोगावले यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण या सगळ्या घडामोडींमुळे रायगडचा पालकमंत्री पद तटकरे यांच्याकडेच कायम राहणार अशी भीती शिंदे गटाला वाटत आहे. त्यामुळे अमित शाह यांचा तटकरेंच्या घरी जाणं हे एक प्रकारे भरत गोगावले यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं असल्यास देखील चर्चा रंगले आहेत.