Kasba By Election : चंद्रकांतदादांना खिजवलं : कोल्हापूरातही धंगेकरांच्या विजयाचा जल्लोष !

कोल्हापुर : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत विजयी झालेले कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष कोल्हापुरातही पाहायला मिळाला. ऐतिहासिक ताराराणी चौक कावळा नाका कोल्हापूर येथे ‘धिस इज धंगेकर’ असा फ्लेक्स लागलेला दिसला. या फ्लेक्समधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना खिजवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पुण्यामध्ये कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार सुरू होता. यावेळी […]

Dhangekar Patil

Dhangekar Patil

कोल्हापुर : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत विजयी झालेले कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष कोल्हापुरातही पाहायला मिळाला. ऐतिहासिक ताराराणी चौक कावळा नाका कोल्हापूर येथे ‘धिस इज धंगेकर’ असा फ्लेक्स लागलेला दिसला. या फ्लेक्समधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना खिजवण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

पुण्यामध्ये कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार सुरू होता. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका प्रचारसभेमध्ये बोलताना म्हटले होते की, मी गेल्या काही दिवसांपासून एकतोय रासने विरूद्ध धंगेकर. हू इज धंगेकर. असं त्यांनी कॉंग्रेसला विचारत चिमटा काढला होता. त्यानंतर कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला.

कसब्यात रासनेंच्या झालेल्या पराभवाचं खापर ‘या’ 6 नेत्यांवर फुटणार

त्यानंतर माध्यमांशी बोतलाना चंद्रकांत पाटलांच्या ‘हू इज धंगेकर’ या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी रवींद्र धंगेकर. त्यावर चांगलाच हशा पिकाला आणि हा व्हिडीओही सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापुरातही ‘धिस इज धंगेकर’ असा फ्लेक्स लागलेला दिसला. या फ्लेक्समधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना त्यांच्या हू इज धंगेकर या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटलांना खिजवण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

Exit mobile version