Apmc Election Pathardi : नगर जिल्ह्यातीप पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपने राष्ट्रवादीला जोरदार हिसका दिला आहे. भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत तब्बल सतरा जागा भाजपने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणे यांच्या गटाला अवघी एक जागा मिळाली आहे.
APMC Election : इस्लामपुरात राष्ट्रवादीच ! तब्बल 17 जागा जिंकत भाजपला पछाडले
या बाजार समितीमध्ये ढाकणे गटाची सत्ता होती. परंतु आमदार मोनिका राजळे यांनी मतदारसंघातील बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी जोरदार ताकद लावली होती. ढाकणे गटाविरोधात तगडे उमेदवार दिले होते. ही बाजार समितीमध्ये अटीतटीची लढत होईल, असे बोलले जात होते. परंतु राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने १८ पैकी १७ जागा जिंकत ढाकणे यांच्या जगंदबा मंडळाला धोबीपछाड दिली आहे.
दोंडाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत BJP चे वर्चस्व; 18 पैकी 18 जागांवर भाजप विजयी
प्रताप ढाकणे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा वेगळा प्रयोग केला होता. जुन्या तब्बल १६ संचालकांचा पत्ता कट केला होता. याची जोरदार राजकीय चर्चा झाली होती. त्यातील काही माजी संचालक हे नाराज झाले होते. त्याचाही फटका ढाकणे यांना बसला असल्याचे बोलले जात आहे. बाजार समिती निवडणुकीतील पराभवामुळे ढाकणे यांचा आता पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत ही कस लागणार आहे. ढाकणे हे विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेतेही पाथर्डीत आणले होते. परंतु बाजार समितीमध्ये त्यांना जोरदार फटका बसला आहे.