दोंडाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत BJP चे वर्चस्व; 18 पैकी 18 जागांवर भाजप विजयी
BJP dominates Dondai Agricultural Income Market Committee elections : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी(Election of Market Committees) शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यापैकी 34 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच झाली आहे. त्यानंतर आता काही बाजार समिती निवडणुकींचे निकालही समोर येऊ लागले. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Dondaoi Agricultural Produce Market Committee) निकाल देखील समोर आला आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने झेंडा फडकवला आहे.
18 पैकी एकूण 18 जागांवर भाजप विजयी झाले आहेत. तर याआधीच जय किसान पॅनलच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर 16 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या सर्व 16 जागांवर भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. तर या निवडणुकीच्या निकालात माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्या परिवर्तन पॅनलचा सुफडा साफ करत जयकुमार रावल यांच्या जय किसान पॅनल ने मोठा विजय मिळवला आहे. या निकालामुळं माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांचा पुन्हा एकदा वरचष्मा पाहायला मिळाला.
भुसावळात महाविकास आघाडीचे पानिपत, खडसेंना धक्का; आघाडीला फक्त 3 जागा
दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध झालेल्या दोन जागा देखील जयकुमार रावल यांच्या जय किसान पॅनलने मिळवल्या आहेत. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार जयकुमार रावल आणि माजी मंत्री हेमंत देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र दोंडाईचा बालेकिल्ला हा जयकुमार रावल यांच्याच हाती असल्याचे या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपा प्रणित असलेल्या जय किसान पॅन ने दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवल्याने कार्यकर्त्यांनी यावेळी जल्लोष साजरा केला.
संपूर्ण जिल्ह्याचे आता दोंडाईचा नंतर धुळे साखरी व शिरपूर या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोणाचे वर्चस्व राहते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.