Download App

मुंबईतील प्रभादेवीत शिंदे गट-ठाकरे गट आमने सामने; धनुष्यबाण चिन्ह हटवल्याने तुफान राडा

प्रभादेवी परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा एकदा आमने-सामने

  • Written By: Last Updated:

Mumbai Prabhadevi :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने (Shiv Sena) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. प्रभादेवी परिसरात होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंच्या पदाधिकार्यांनी रात्रीच्या वेळेस काढल्यामुळे स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाले. फुटपाथवरील होर्डिंग वाद- स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी स्वखर्चातून बसवलेले बोर्ड ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी हटवलं, असा आरोप शिवसेना पदाधिकार्यांनी केला आहे. सत्तांतरानंतर, ठाकरे गटाचे पदाधिकारी या होर्डिंगवर इतर राजकीय पक्षाचे संदेश लावत होते. यावर शिवसेना पदाधिकार्यांनी आधीच आक्षेप घेतला होता आणि स्थानिक पोलिसांना पत्र व्यवहाराद्वारे ही बाब निदर्शनास आणून दिली होती.

Mohammad Yunus: बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन, अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस नेतृत्व करणार

मंगळवारी रात्री ठाकरेंचे पदाधिकारी आहुजा टॉवर येथील शिवसेना पक्षाच्या होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह कापून हटवत होते. यावेळी शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या पदाधिकार्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली. शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी ही तक्रार दिली. तक्रारीनंतर माहिम पोलिस ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी, अमर लब्देसह अन्य एकावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आमदार सदा सरवणकर यांनी हे बोर्ड स्वखर्चातून बसवण्यात आल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केला असून, या बाबतीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्र व्यवहाराद्वारे ही बाब पोलिसांना निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती मिळत आहे. प्रभादेवी परिसरात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Tags

follow us