Download App

निर्णय होईंपर्यत चिन्ह गोठवू नका; शरद पवार गटाची मागणी, पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला

Ajit Pawar VS Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी निवडणूक आयोगात शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. पहिल्या दिवसाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सुरुवातीला युक्तिवादआधी दोन्ही गटाला कागदपत्रं सादर करण्यास सांगितले होते. अजित पवार गटाकडून ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. तर शरद पवार गटाने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. पुढील सुनवाणी 9 ऑक्टोबरला होणार आहे.

शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, त्यांची अध्यक्षपदाची निवड ही बेकायदेशीर असल्याचा मोठा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर एक गट आम्हाला सोडून बाहेर पडला आहे पण मूळ पक्ष आमचाच आहे. पक्षावरचा दावा आमचाच योग्य आहे. राष्ट्रवादीच्या वादावर निर्णय होईपर्यंत हे चिन्हं आमच्याकडेच द्या, ते गोठवू नका, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.

अजित पवार गटाकडून केलेला युक्तीवाद
– अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पक्ष संघटनेची माहिती देण्यात आली.
– संघटनेतील नियुक्त्या फक्त एका पत्राद्वारे होतात.
– राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला.
– त्यामुळे आमदारांची संख्या महत्वाची आहे.
– पक्षाच्या घटनेचं पालन व्यवस्थित होत नाही.
– प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर
– जयंत पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधीच
– शरद पवार गटाने केलेल्या नियुक्त्या अवैध
– 53 पैकी 42 आमदार आमच्या बाजूने
– विधानपरिषदेचे 9 पैकी 6 आमदार आमच्या बाजूने
– नागालँडमधील 7 पैकी 7 आमदार आमच्याकडे
– लोकसभेत 5 पैकी 1 खासदार आमच्याकडे
– राज्यसभेत 4 पैकी 1 खासदार आमच्याकडे
– शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात
– मुख्य प्रतोद आमच्या बाजूने, 9 आमदारांवरील कारवाईचं पत्र बेकायदेशीर
– 24 पैकी 22 राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमज्या बाजूने
– शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड बेकायदेशीर

Asian Games : अंतिम फेरीत जपानचा पराभव; 9 वर्षांनी भारतीय हॉकी संघाची ‘सुवर्ण’ मोहोर

शरद पवार गटाने केलेला दावा
– एक गट आम्हाला सोडून बाहेर पडला, पण मूळ पक्ष आमचाच
– आमदार सोडून गेले असले तरी पक्षावरचा दावा आमचाच योग्य आहे.
– राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करु शकत नाही.
– सर्वाधिक अधिकार शरद पवारांकडे त्यामुळे अजित पवार पक्षावर दावा करु शकत नाही.
– निर्णय होईपर्यत चिन्ह गोठवू नका

Tags

follow us