Asian Games : अंतिम फेरीत जपानचा पराभव; 9 वर्षांनी भारतीय हॉकी संघाची ‘सुवर्ण’ मोहोर
Indian Hockey Team Win Gold In Final : भारतीय पुरुष हॉकी संघाने हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. हॉकीमध्ये 2018 च्या सुवर्णपदक विजेत्या जपानचा 5-1 ने पराभव करत भारताने तब्बल नऊ वर्षांनंतर हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. 2014 च्या इंचॉन आशियाई स्पर्धेत भारताने शेवटच्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सुवर्णपदाकासह भारतीय हॉकी संघाने 2024 मध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमधील तिकीटही फायलन केले आहे.
Hangzhou Asian Games: Indian Hockey team beat Japan 5-1 to win gold medal and qualify for Paris Olympics 2024 pic.twitter.com/av5WZ4bB8E
— ANI (@ANI) October 6, 2023
2023 आणि 2014 पूर्वी भारतीय पुरुष हॉकी संघाने 1966 आणि 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. चार सुवर्णांव्यतिरिक्त टीम इंडियाने 1958, 1962, 1970, 1974, 1978, 1982, 1990, 1994, 2002 आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर 1986, 2010 आणि 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
Asian Games 2023 : बांग्लादेशचा पराभव! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
2023 च्या आशियाई खेळांमध्ये भारताचा प्रवास
सध्या सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. संघाने ग्रुप स्टेजमधील पाचही सामने जिंकले. तसेच ग्रुप फेरीत 58 गोल केले होते. भारताने अंतिम फेरीत पाच गोल केले तर, जपानच्या संघाला केवळ एक गोल करता आला. म्हणजेच संपूर्ण स्पर्धेत भारताने 68 गोल केले.
World Cup चं कॉकटेल कनेक्शन, दारू उत्पादक कंपन्यांसोबत कोटींचा करार
कुणा कुणाला हरवले
आशियाई स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये भारतीय हॉकी संघाने पहिला सामन्यात उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव केला. दुसरा सामन्यात सिंगापूरचा 16-1 ने तिसऱ्या सामन्यात जपानचा 4-2 ने, चौथ्या सामन्यात पाकिस्तानचा 10- 2, पाचव्या सामन्यात बांग्लादेशचा 12-0 ने पराभव केला. तर, उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 5-3 ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर अंतिम फेरीत 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन जपानचा 5-1 ने पराभव करत तब्बल नऊ वर्षांनी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
कुणी किती गोल केले
भारताकडून कर्णधार हमरनप्रीत सिंगने 2 तर, मनप्रीत सिंह, अमित रोहिदास, अभिषेक यांनी प्रत्येकी 1 गोल केले. मात्र, प्रतिस्पर्धी जपानला सामन्यात केवळ एकच गोल करण्यात यश आले. या विजयानंतर आशियाई स्पर्धेत भारताने आतापर्यंत 22 सुवर्णपदकं पटकावले असून, सर्व पदकांचीसंख्या 92 वर पोहोचली आहे.