Asian Games 2023 : बांग्लादेशचा पराभव! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Asian Games 2023 : बांग्लादेशचा पराभव! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरुच आहे. आताही क्रिकेटमध्ये भारतीय संघाने (Team India) धडाकेबाज कामगिरी करत बांग्लादेशला (IND vs BAN) पाणी पाजले आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेशवर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. आता पाकिस्तानविरोधात अंतिम सामना होणार आहे. हा सामना जिंकला तर भारतीय संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरणार आहे. या सामन्यात बांग्लादेशने 97 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने 9.2 ओव्हर्समध्ये एक गडी गमावत हे लक्ष्य गाठले.

World Cup 2023 : टीम इंडियाला झटका! शुभमन गिल पहिलाच सामना मुकणार?

या सामन्यात तिलक वर्माने 55 तर ऋतुराज गायकवाडने 40 धावा केल्या. यानंतर आता उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल त्याला गोल्ड मेडल मिळेल. आज चीनमधील हांगझू येथे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सेमी फायनलमधील सामना होत आहे. जर हा सामना पाकिस्तानने जिंकला तर अंतिम सामन्यात भारताच्या विरुद्ध खेळावे लागेल. अफगाणिस्तान जिंकला तर अफगाणिस्तानचा संघ अंतिम सामन्यात दिसेल.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 96 धावा केल्या. भारताकडून आर. साई किशोरने 12 रन देत तीन विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरनेही घातक गोलंदाजी करत 15 धावांत बांग्लादेशचे दोन गडी बाद केले. यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच झटका बसला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला.

World Cup 2023 : बीसीसीआयची मोठी घोषणा! वर्ल्डकप सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मिळणार ‘ही’ सुविधा

यानंतर मात्र तिलक वर्मा आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड या दोघांनी विजयी भागीदारी केली. तिलक वर्माने 55 तर ऋतुराजने 40 धावांची शानदार खेळी केली. या दोघांच्या भागीदारीने संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत एन्ट्री घेतली आहे. आता आज होणाऱ्या दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेत्या संघाशी भारताचा सामना होईल. या सामन्यात अशीच दमदार कामगिरी करून टीम इंडिया सुवर्णपदक मिळवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भारताचं गोल्ड मेडल

चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. अविनाश साबळे याने आज चीनमध्ये महाराष्ट्राचे नाव गाजवले, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तसेच, अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. त्याने 8:19:53 मिनिटे पूर्ण केले. या स्पर्धेतील भारताचे हे 12वे सुवर्णपदक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube