Download App

अरविंद केजरीवाल आजचे गांधी! भाजप त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, राघव चढ्ढा यांचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी सीबीआय समोर अरविंद केजरीवाल हे चौकशीसाठी हजर होण्याच्या एक दिवस आधी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे आजचे महात्मा गांधी आहेत आणि अरविंद केजरीवाल त्यांना संपवतील हे भाजपला माहीत आहे.

यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आम आदमी पक्ष राजकीय दृष्ट्या संपवून टाकायचा आहे. पण ते केजरीवाल यांच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत. कारण ‘आप’ हा चळवळीतून जन्माला आलेला पक्ष आहे.

Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत

सीबीआय-ईडीला न घाबरणारे केजरीवाल

यावेळी टीका करताना ते म्हणाले की ज्यांना भीती वाटते त्यांच्यावर तपास यंत्रणा वापराव्यात. अरविंद केजरीवाल हे त्या पोलादी माणसाचे नाव आहे जे तुमच्या ED-CBI ला घाबरत नाही. ते पुढे म्हणाले की पंजाबमध्ये जेव्हा हे दारू धोरण लागू झाले तेव्हा तेथील महसूलात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे हा दोष भाजपच्या विचार करण्याचा आहे.

Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत

भाजपला केजरीवाल फोबियाने गाठले आहे

याआधी खासदार राघव चड्ढा म्हणाले होते की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या लोकांची झोप उडवली आहे. त्यामुळे रात्रंदिवस फक्त केजरीवाल त्यांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना झोपेत घाबरवतात. सीबीआयचे समन्स हे भाजपच्या केजरीवाल फोबियाचे लक्षण आहे.

Tags

follow us