Download App

Shital Mhatre : गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

मुंबई : शीतल म्हात्रेंसारख्या चर्चेत असलेल्या व्यक्तीचा पाठलाग होत असेल तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडून गृहखाते काढून घ्यायला हवे. आम्ही सांगत होतो तेव्हा पटत नव्हतं. प्रज्ञा सातवांवर हल्ला झाला तेव्हा कुणाला पटलं नाही. गुलाबराव पाटीलांनी अर्वाच्य भाषा वापरली तेव्हा कुणाला पटलं नाही. अब्दुल सत्तारांनी घाणेरडी भाषा वापरली तेव्हा कुणाला पटलं नाही.

मात्र शीतल म्हात्रेंच्या पाठलाग प्रकरणाच्या निमित्ताने का होईना, म्हात्रे सांगत आहेत म्हणून का होईना, गृह मंत्रालय कुचकामी ठरल आहे हे मान्य केलं पाहिजे. तर राहिला प्रश्न एडिटींग आणि व्हिडिओ मार्फिंग करणे. आतापर्यंत सोनिया गांधी असो किंवा नेहरू असोत यांचे व्हिडिओ एडिटींग किंवा मार्फिंग करणे, गलिच्छ हॅशटॅगचे ट्रेन्ड चालवणे, ही भाजपची संस्कृती आहे आमची नाही. आम्ही अत्यंत संयमी नेतृत्वाखाली काम करणारे आहोत. कोणत्याही पक्षाच्या असोत आम्ही महिलांचा आदर करतो. पण म्हात्रेंच्या प्रकरणी ‘154 अ’ लावणे ही त्यांची बदनामी करणे आहे. अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. त्यावरुन विधानसभेत देखील जोरदार हंगामा झाला. शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव व भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच ज्यांनी कोणी हा व्हिडीओ व्हायरल केला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

एका महिलेने कितीवेळा स्वत:ला सिद्ध करायचे, असे यामिनी जाधव म्हणाल्या आहेत. तसेच या घटनेमागचा मास्टरमाईंड कोण आहे ते शोधून त्याला शासन करा, असे आमदार मनिषा चौधरी म्हणाल्या आहेत. हा एका महिलेच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. याआधी देखील त्यांच्याविषयी टॉयलेटमध्ये घाणेरडे लिहिण्यात आले होते. याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. मला यावर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडून उत्तर हवे आहे, असे चौधरी म्हणाल्या आहेत.

शीतल म्हात्रे नेमक्या आहेत तरी कोण? जाणून घ्या

या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन दोषींना तातडीने शिक्षा करावी याची मागणी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. यावरुन सभागृहात जोरदार हंगामा झाला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज 10 मिनीटांसाठी स्थगित केले होते.

Tags

follow us