Vidhansabha Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) बहुतांश पक्षांनी हळूहळू आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली. एमआयएमने आता एक पाऊल पुढे टाकत विधानसभेसाठी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यासह आणखी 4 उमेदवारांची एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी छत्रपती संभाजीनगरम्ये ही घोषणा केली.
साहेबांच्या मनातलं नाही, दादांच्या मनातलं कळतं… पण; जयंत पाटलांचं तिरकस विधान
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने जोरदार तयारी सुरू केली होती. बीड, परळीसह अन्य जिल्ह्यातील एमआयएमच्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली. संभाव्य उमेदवारांच्या याद्याही तयार करायला सुरूवात केली. दरम्यान, एमआयएमने महाविकास आघाडीला प्रस्तावही दिला आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत जर याबाबत निर्णय झाला नाहीतर निवडणूक स्वबळावर लढवण्याचा इशाराही दिला आहे.
चाळीस वर्षांत पहिल्यांदाच शरद पवारांना देव आठवले, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
एमआयएमने महाविकास आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता विधानसभेसाठी 5 उमेदवार जाहीर केलेत. एमआयएमने जाहीर केलेल्या पाच उमेदवारांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा संधी दिली गेली. तर सोलापूरमधून फारुख शब्दी, धुळ्यातून फारूख शाह, मालेगावमधून मुफ्ती इस्माईल आणि मुंबईतून फैयाज अहमद खान यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घोषणा केली.
एमआयएमने छत्रपतींनी संभाजीनगरमधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर केली. पण ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? याबाबत सस्पेन्स कायम ठेवला. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी ही गुप्तता पाळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. असं असलं तरी ओवेसी यांनी जलील यांना मध्य ऐवजी पूर्व मतदारसंघातून तयारी करण्यास सांगितल्याची खात्रीलायक माहिती आहे.