चाळीस वर्षांत पहिल्यांदाच शरद पवारांना देव आठवले, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Chandrasekhar Bawankule on Sharad Pawar: आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले जावई सदानंद सुळे (Sadananda Sule) आणि नात रेवती सुळेंसह लालबागच्या राजाचे (king of Lalbagh) दर्शन घेतले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, पवारांच्या या कृतीवर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली. शरद पवारांना देव आठवले, चाळीस वर्षांत असे पहिल्यांदाच घडले आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) शरद पवारांवर निशाणा साधला.
अजितदादा निवडणूक लढवणार नाही? मंत्री छगन भुजबळांचं सूचक विधान
भाजप आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर काय झाले असा सवाल विरोधी पक्षांनी केला.
आपल्या बहुआयामी विकासामुळे, FDI मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे.
पण महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून आजचे चित्र समोर आले आहे. शरद पवारांना देव… pic.twitter.com/eTRssRJbhR— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 9, 2024
बावनकुळेंनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं की, भाजप आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर काय झाले असा सवाल विरोधी पक्षांनी केला. आपल्या बहुआयामी विकासामुळे FDI मध्ये महाराष्ट्र प्रथक क्रमांकाचे राज्य बनले आहे. पण, महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून आजचे चित्र समोर आले आहे, शरद पवारांना देव आठवले, असं म्हणत बावनकुळेंनी पवारांना लक्ष्य केलं.
Vidhansabha Election : राज्यात कोणाचं सरकार येणार? सर्व्हेनं दिलं धक्कादायक उत्तर…
पुढं त्यांनी लिहिलं की, शरद पवारांना देव आठवले. महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत. चाळीस वर्षांत प्रथमच असे घडले…. याला राजकीय पोळी भाजणे म्हणतात, अशी टीकाही बावनकुळेंनी केली.
दरेकर काय म्हणाले?
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील एका व्हिडिओ जारी करून पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, शरद पवार चाळीस वर्षांनंतर रायगडावर गेले होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर 30 वर्षांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले आहेत. मला वाटतं की, निवडणुकीमुळे का होईल, आता रायगडाची, लालबागच्या राजाची आठवण पवारांना आली, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.