BJP Leader Criticize Raj Thackeray Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील आज एक ऐतिहासिक दिवस होता. आज वरळीत मराठीचा भव्य विजयी मोर्चा पार पडला. यावेळी तब्बल दोन दशकानंतर ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) एकत्र आले आहेत. तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा मराठी हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचं देखील (Politics) म्हटलंय. त्यांच्या या भाषणानंतर आता भाजप नेते ठाकरेंच्या या मेळाव्यावर टीका करत आहेत.
राजकीय नौटंकी
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) म्हटलंय की, मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाहीतर ती धोरणात दिसली पाहिजे. पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं. आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात.
भाषेसाठी नाही ही तर.. निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी !
महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता “भाऊबंदकी” आठवली… ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता.
भाषेचे प्रेम वगैरे काही…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 5, 2025
उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे. यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की, आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेनं आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे, असं ट्विटच बावनकुळेंनी केलं आहे.
अडचणीला शिवतिर्थावर जाता मग भाषेसाठी काय होत?, अभिनेत्री तेजस्विनी पंडित भडकली
भाऊबंदकी आठवली
मंत्री आशिष शेलार यांनी (
) सोशल मिडिया पोस्ट करत म्हटलंय की, भाषेसाठी नाही, ही तर निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी आहे. महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता “भाऊबंदकी” आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले. त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता.
मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाहीतर ती धोरणात दिसली पाहिजे. पण…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 5, 2025
भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच. आणि ते यांच्या लेखी नाहीच. महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार. त्यासाठी सत्ता, यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरें यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे. निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न, असा टोला शेलारांनी ठाकरेंना लगावला आहे.
आमिर खानला ‘सितारे ज़मीन पर’ च्या यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान
म मराठीचा नाही तर सत्तेचा…
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील ठाकरेंवर निशाणा साधलाय. त्यांनी म्हटलंय की, म मराठीचा नाही तर सत्तेचा आहे. गेले अनेक दिवस दोन भाऊ एकत्र येणार म्हणून सुरू असलेला अंक एकदाचा आज उघडला. या दोघांकडून अपेक्षा असणाऱ्याच्या मनांत निराशाच आली. कारण मराठी, मराठी भाषा याबद्दल काय होतं या कार्यक्रमात?
म मराठीचा नाहीच… सत्तेचाच
गेले अनेक दिवस दोन भाऊ एकत्र येणार… म्हणून सुरू असलेला अंक एकदाचा आज उघडला…
आणि या दोघांकडून अपेक्षा असणाऱ्याच्या मनांत निराशाच आली
कारण मराठी, मराठी भाषा याबद्दल काय होतं या कार्यक्रमात?वाजत गाजत दोन्ही भाषण झाली पण या भाषणात …
▪️मराठी साठी…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 5, 2025
वाजत गाजत दोन्ही भाषण झाली. पण या भाषणात मराठी साठी काही कार्यक्रम? उत्तर नाही. मराठी भाषेच्या विकासासाठी काही धोरण? उत्तर नाही. मराठी युवकाला प्रगती साठी काही दिशा दर्शक? उत्तर नाही. उध्दव ठाकरेंचं भाषण तर नेहमीच टोमणे मारणारं. भाजपावर, मोदीजींवर टीका करणारं होतं. शेवटी तर त्यांनी कबुली पण दिली महापालिकेसाठीच नाही, तर महाराष्ट्रातसुध्दा जिंकण्यासाठी आम्ही एकत्र आलो.