Download App

“मी माझी चूक मान्य करतो, माफी मागतो”, मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांना उपरती

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी माझी चूक मान्य करतो आणि माफी मागतो. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन.

Sushil Kedia Apology : मु्ंबईत तीस वर्षे राहूनही मला मराठी येत नाही काय करायचं बोल अशा भाषेत वक्तव्य करणारे उद्योजक सुशील केडिया यांना (Sushil Kedia) अखेर शहाणपण सुचलं आहे. सुशील केडिया यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल जाहीर माफी मागितली आहे. मराठी बोलण्याचा मी प्रयत्न करेन. मी जे काही बोललो ते चुकीच्या मानसिकतेतून आणि तणावातून बोललो होतो. माझ्या त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून काहींनी वाद निर्माण केला असे केडिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, केडिया यांच्या वक्तव्यावर संतप्त होत मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं ऑफीस फोडलं होतं. या घटनेनंतर वाद वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी माझी चूक मान्य करतो आणि माफी मागतो. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन असे केडिया म्हणाले आहेत.

नेमकं काय घडलं होतं

काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर येथील एका व्यापाऱ्याला मराठी भाषेचा अपमान केला म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीची व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी केडिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. राज ठाकरे तुम्ही लक्षात घ्या की मुंबईत 30 वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही. आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांनी मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करत आहात तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला जात होता. मनसेनेही इशारा दिला होता. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी थेट त्यांचं ऑफीसच फोडलं.

नाटके केली तर कानाखाली आवाज…, उद्योजक केडिया प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मनसे आक्रमक झाल्याचे लक्षात येताच केडिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सपशेल माफी मागितली. केडिया म्हणाले, नमस्कार, माझा ट्विटचा वेगळा अर्थ काढण्यात आला. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी माझे वक्तव्य मागे घेतो. राज ठाकरेंबद्दल मला नेहमीच आदर, कृतज्ञता वाटत आली आहे. मी माझी चूक स्वीकारतो. तसेच मी आता अपेक्षा करतो की वातावरण शांत करां मी त्यांचा आभारी आहे, असे सुशील केडिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

follow us