Download App

Ashish Shelar : ‘उबाठा’ काय वगळणार? काँग्रेस की सावरकर? सावरकरांंचा धडा वगळल्याने शेलार आक्रमक

Ashish Shelar : कर्नाटकमध्ये हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आला आहे.(Karnataka Remove Savarkars Lesson) त्यावर आता भाजपने (BJP) हा मुद्दा उचलून धरत कॉंग्रेस ( Congress) आणि उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackrey)टीका करायला सुरूवात केली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी देखील टीकास्त्र सोडले आहे. ( Ashish Shelar Criticizes Congress-Thackrey On Karnataka Remove Savarkars Lesson From Text Books )

आधी चव्हाण, आता पटोलेंची दिल्लीवारी; काँग्रेसमध्ये पुन्हा खांदेपालट होणार?

काय म्हणाले अशिष शेलार?

अशिष शेलार यांनी पाठ्यपुस्तकांतून स्वातंत्र्यवीरांचा धडा वगळल्याने ट्विट करत कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉ. हेडगेवार यांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या कार्नाटक सरकारच्या तुघलकी निर्णयाचा आम्ही निषेध करतो!अरे, बेक्कल काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान सुपुत्रांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळालही पण जनतेच्या मनातून आणि इतिहासाच्या पानातून त्यांचे महान कार्य कधीच वगळू शकणार नाही!’ अशी टीका शेलारांनी केली आहे.

रोहित पवार-राम शिंदें यांच्या कार्यकर्त्यांतील वाद टोकाला ! फेसबुक कमेंटवरून भिडले

त्याचबरोबर त्यांनी यावेळी या मुद्द्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी ‘उबाठा’ आता काय वगळणार? काँग्रेस की सावरकर? काँग्रेसच्या असल्या 60 वर्षांच्या कारभाराला कंटाळून जनतेने त्यांना देशातूनच वगळून टाकायचे ठरवलेय! तर काँग्रेसला साथ देणाऱ्या ‘उबाठा’ला आमदारांनी शिवसेनेतून वगळलेच आता महाराष्ट्रातील जनताही लवकरच उबाठा आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवक्त्यांना धडा शिकवेल!

फडणवीस काय म्हणाले?

कॉंग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा काही वेगळं आपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्यांकाचं लांगूलचालन करण्यासाठी कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकार निर्णय घेत आहे. त्यावर माझा महाविकास आघाडीला सवाल आहे. तुम्ही राज्यात कर्नाटक पॅटर्न आणणार असल्याचं म्हणत आहात हाच का तो कर्नाटक पॅटर्न?

त्याचबरोबर माझा सवाल उद्धव ठाकरे यांना देखील आहे की, आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? कारण ज्यांच्या मांडिला- मांडी लावून तुम्ही बसलात त्यांनी जर अशा प्रकारे स्वातंत्र्यावीर सावरकरांचं नाव पुसायला निघाले आहेत. ते धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत. त्यावर तुमचं मत काय? हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही सत्तेसाठी तुम्ही हा समझोता केला हे यातून स्पष्ट होत आहे.

Tags

follow us