रोहित पवार-राम शिंदें यांच्या कार्यकर्त्यांतील वाद टोकाला ! फेसबुक कमेंटवरून भिडले

  • Written By: Published:
रोहित पवार-राम शिंदें यांच्या कार्यकर्त्यांतील वाद टोकाला ! फेसबुक कमेंटवरून भिडले

Ahmednagar Crime: आमदार राम शिंदे (Ram Shinde) व आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांच्या कार्यकर्त्यांमधील वाद टोकाला गेला आहे. राम शिंदेंचे समर्थक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे (Sachin Potare) व त्यांच्या मुलाला मारहाण झाली आहे. आमदार रोहित पवारांच्या विरोधात फेसबुकवर कमेंट केल्याने मारहाण झाल्याचा आरोप पोटरे यांचा आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रोहित पवार यांचे काही समर्थकही पोलीस ठाण्यात जमा झाले आहेत. त्यांच्याकडून पोटरे यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे.(bjp-sachin-potare-fire-aganist-ncp-worker)

गेल्या महिन्यात आमदार राम शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यानंतर आता आमदार शिंदे यांचे समर्थक सचिन पोटरे यांनी एक गुन्हा नोंदविला आहे. सचिन सखाराम पोटरे यांच्या फिर्यादीवरून सोमनाथ रोहिदास यादव, सुधीर रामदास यादव व इतर पाच ते सहा जणांविरोधात मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी हे कर्जतमधील बहिरोबावाडी येथील आहेत.

पवारांना मी धमकी दिली नाही; सुप्रिया सुळें अन् रोहित पवारांविरोधात मानहानीचा दावा करणार : सौरभ पिंपळकर

बाजार समितीच्या निवडणुकीत रोहित पवार गटाचा संचालक फुटला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यावर घरावर काळ्या शाईने गद्दार असे लिहिले होते. ही बातमी ऑनलाइन फेसबुकवर प्रसिध्द झाली होती. त्यावर पोटरे यांनी एक कमेंट केली होती. ज्यावेळी एक नेता बाहेरून येतो. विरोधकांना दादागिरी, दहशतीचे व दडपशाही करून वेठीस धरण्याचे प्रयत्न करतो आणि स्वतःच्या पक्षाच्या भूमिपूत्र असणाऱ्या जिल्हाध्यक्षांच्या घरावर आपल्या टोळक्याला दगडफेक करतात. त्यावेळी त्याची फक्त राजकीय अपरिपक्तवाच दिसून येत नाही तर तो त्यांच्या राजकीय सीमा सुध्दा सीमीत करत असतो. टोळी राजकारणाचा जाहीर निशेष अशी कमेंट केली होती.

Manipur Violence: मणिपूरमध्ये जमाव हिंसक, केंद्रीय मंत्र्यांच्या घराला लावली आग

ही कमेंट केल्यानंतर गुरुवारी केली होती. त्यानंतर सोमनाथ यादव याने पोटरे यांच्या कमेंटला उत्तर दिले. तुम्ही भाजपचे आहात. तुम्हाला किती पगार आणि पॅकेज देते, तुम्ही अशा सतत पोस्ट आणि कमेंट करत असतात, असे उत्तर दिले. त्याला पोटरे यांनी उत्तर देताना माझ्या वाळूच्या गाड्या नाहीत, ठेकेदारी नाही म्हटले. त्यानंतर सोमनाथ यादव व इतर जण पोटरे यांच्या घराबाहेर आले. यादवने पोटरे यांना फोन करू घराबाहेर बोलविले. पोटरे यांनीही ही माहिती कर्जतला पोलिसांना दिल्यानंतर ते घराखाली आले. त्यावेळी सोमनाथ यादव याने मुलाला मारहाण केली. तर पोटरे यांच्या पत्नीच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर आरोपी हे पळून गेल्याचे फिर्यादीत पोटरे यांनी म्हटले आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडल्यानंतर शुक्रवारीही पवार समर्थक काही जण पोलिस स्टेशनला आले आहे. त्यांनी पोटरेविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube